Gayatri Joshi | कोण आहे गायत्री जोशीचा अब्जाधीश पती? इटलीतल्या भीषण कार अपघातात सामील

इटलीतील सार्डिनिया याठिकाणी दोन ते तीन कारची एकमेकांना धडक झाली. त्यापैकी एक कार गायत्रीची होती. तर फरारीमधून प्रवास करणाऱ्या स्विस दाम्पत्याचं या भीषण अपघातात निधन झालं. या अपघातामुळे गायत्री जोशी सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

Gayatri Joshi | कोण आहे गायत्री जोशीचा अब्जाधीश पती? इटलीतल्या भीषण कार अपघातात सामील
Gayatri Joshi and Vikas OberoiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 4:07 PM

मुंबई | 4 ऑक्टोबर 2023 : अभिनेता शाहरुख खानच्या ‘स्वदेस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जोशी सध्या एका अपघातामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. गायत्री जोशी आणि तिचा पती विकास ओबेरॉय यांच्या कारचा इटलीत भीषण अपघात झाला. या अपघातात दोन ते तीन गाड्यांची जोरदार टक्कर झाली आणि एका वृद्ध स्विस जोडप्याचा मृत्यू झाला. फरारी आणि लॅम्बोर्गिनीसह इतर काही स्पोर्ट्स गाड्यांनी त्यांच्यापुढे असलेल्या कॅम्पर व्हॅनला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा दुर्दैवी अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातात गायत्री आणि तिचा पती विकास यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

दोन ते तीन गाड्यांची एकमेकांना जोरदार टक्कर झाल्यानंतर फरारीला आग लागली. त्यामुळे त्या गाडीत असलेल्या 63 वर्षीय मेलिसा क्रॉटली आणि 67 वर्षीय मार्क्स क्रॉटली यांचा मृत्यू झाला. हा अपघात घडत असताना त्यांच्या कारच्या मागे असलेल्या एका कारच्या डॅश कॅममधून अपघाताचा व्हिडिओ शूट झाला. सध्या हा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसणाऱ्या निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनीतून गायत्री आणि विकास प्रवास करत होते.

हे सुद्धा वाचा

कोण आहे गायत्रीचा पती विकास ओबेरॉय?

गायत्री जोशीचा पती विकास ओबेरॉय हे ओबेरॉय रियॅल्टी लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ओबेरॉय रियॅल्टी लिमिटेडची स्थापना रणवीर ओबेरॉय यांनी तीन दशकांपूर्वी केली होती. प्रॉपर्टी व्यतिरिक्त विकास हे हाऊसिंग, कॉर्पोरेट, हॉस्पिटल आणि रिटेलमध्येही गुंतवणूक करतात. विकास ओबेरॉय हे मुंबईतील प्रसिद्ध वेस्टीन हॉटेलचे मालकसुद्धा आहेत. फोर्ब्सने दिलेल्या वृत्तानुसार विकास ओबेरॉय हे मुंबईत एक मॉल, हॉटेल आणि ऑफिस टॉवर उभारत आहेत.

अपघाताचा व्हिडीओ

विकास ओबेरॉय हे मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित हॉवर्ड बिजनेस स्कूलमध्येही शिक्षण घेतलंय. 2005 मध्ये त्यांनी अभिनेत्री गायत्री जोशी लग्न केलं. या दोघांना दोन मुलं आहेत. विकास ओबेरॉय यांना स्पोर्ट्स कारची फार आवड आहे. याशिवाय त्यांच्याकडे पायलटचाही परवाना आहे. ते त्यांचं Cirrus SR22 Tango हे विमान स्वतः उडवतात. याशिवाय त्यांना वाचन, प्रवास आणि स्कीईंगचीही आवड आहे.

Non Stop LIVE Update
उडता पंजाब झाला आता उडता महाराष्ट्र होणार का? सुप्रिया सुळे यांची टीका
उडता पंजाब झाला आता उडता महाराष्ट्र होणार का? सुप्रिया सुळे यांची टीका.
मला तिकीट दिलं तर मी जिंकणार..उमेदवार कुणी का असंना - रवींद्र धंगेकर
मला तिकीट दिलं तर मी जिंकणार..उमेदवार कुणी का असंना - रवींद्र धंगेकर.
आव्हाडांनी तुतारी वाजवली पण... अमोल मिटकरी यांनी काय दिले ओपन चॅलेंज?
आव्हाडांनी तुतारी वाजवली पण... अमोल मिटकरी यांनी काय दिले ओपन चॅलेंज?.
ज्या समाजाने देव केलं..तोच उद्या दगडं मारील, बारसकर बरसले
ज्या समाजाने देव केलं..तोच उद्या दगडं मारील, बारसकर बरसले.
'ही अजितदादांची करामत, 40 वर्षांनंतर शरद पवारांना...,' देवेंद्र फडणवीस
'ही अजितदादांची करामत, 40 वर्षांनंतर शरद पवारांना...,' देवेंद्र फडणवीस.
'एकाने तुतारी वाजवायची, एकाने मशाल घेऊन....,' काय म्हणाले संजय शिरसाट
'एकाने तुतारी वाजवायची, एकाने मशाल घेऊन....,' काय म्हणाले संजय शिरसाट.
शरद पवार यांना 'तुतारी', छगन भुजबळ म्हणाले जुनं चिन्हच....
शरद पवार यांना 'तुतारी', छगन भुजबळ म्हणाले जुनं चिन्हच.....
...नाही तर घरी बसा, राहुल नार्वेकर कोणावर संतापले
...नाही तर घरी बसा, राहुल नार्वेकर कोणावर संतापले.
आज त्यांना रायगड आठवला ? राज ठाकरे यांची शरद पवारांवर टीका
आज त्यांना रायगड आठवला ? राज ठाकरे यांची शरद पवारांवर टीका.
'तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, महाराष्ट्रात...- चंद्रकांत पाटील
'तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, महाराष्ट्रात...- चंद्रकांत पाटील.