कतरिना-विकीच्या बाळाची जन्मतारीख एवढी खास का मानली जातेय? सोशल मीडियावर का होतेय चर्चा?
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना 7 नोव्हेंबर 2025 रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले. ही लोकप्रिय जोडी आता पालक झाले आहेत. चाहत्यांमध्येही याचा उत्साह दिसून येत आहे. पण सोबतच सोशल मीडियावर कतरिना आणि विकीच्या बाळाची जन्मतारीख खास का मानली जातेय? त्यावरून बरीच चर्चा होताना दिसत आहे. त्यामागचं नेमकं कारण जाणून घेऊयात.

कतरिना आणि विकी कौशल यांच्या घरी 7 नोव्हेंबर 2025 रोजी छोट्या चिमुकल्याचं आगमन झालं आहे. विकी आणि कतरिनाला पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. त्यांच्यावर सध्या चाहत्यांसह सेलिब्रिटींकडूनही प्रेमाचा, आशीर्वादाचा, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल आता एका बाळाचे पालक झाले आहेत. चाहत्यांना फारच आनंद झाला असून सोशल मीडियावर सर्वजण दोघांनाही प्रेम देत आहेत.
कतरिना आणि विकीप्रमाणेच त्यांचा मुलचा जन्माअंक हा 7
यासर्वात लक्षात घेण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे कतरिना आणि विकीप्रमाणेच त्यांचा मुलचा जन्माअंक हा 7 नंबर येत आहे. म्हणजे कतरिना कैफची जन्मतारीख 16 जुलै आहे म्हणजे तिचा मुलांक 7 येतो. त्यानंतर विकीची जन्मतारीख आहे 16 मे म्हणजे त्याचाही मुलांक येतो 7. आणि आता त्यांच्या बाळाची जन्म तारीख आहे 7 नोव्हेंबर, म्हणजे त्याचाही मुलांक येतो 7. आणि ही जन्म तारीख खूप भाग्यवान मानली जाते. होय ज्योतिषशास्त्रानुसार, या अंकाने जन्मलेले लोक अत्यंत भाग्यवान असतात. अशा लोकांवर देवाचे विशेष आशीर्वाद असतात असं म्हटलं जातं.
तर ज्योतिषशास्त्रात 7 हा अंक एवढा खास का मानला जातो, ते जाणून घेऊयात?
अंकशास्त्रात 7 हा अंक खूप शुभ आणि पवित्र मानला जातो. म्हणूनच, हा अंक अनेकांचा आवडता असतो. 7 हा आकडा भाग्यवान मानला जाण्याची अनेक कारणे आहेत. 7 या आकड्याचा विश्वाशी एक अनोखा संबंध असल्याचे मानले जाते. उदाहरणार्थ, सात महासागर, सात नोट्स आणि सात आश्चर्ये, आकाशातही सात आश्चर्ये ज्यात सप्तऋषी, नक्षत्राचा समावेश आहे. इंद्रधनुष्यात सात रंग आहेत आणि लग्नादरम्यान सात फेरे घेतले जातात. आपले आयुष्य देखील सात भागात विभागले गेले आहे. आपल्या आत सात कुंडलिनी चक्रे असतात. आठवड्याचे सात दिवस असतात. या सर्व घटकांमुळे 7 या आकड्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ज्योतिषशास्त्रात, ही संख्या सौभाग्याचे प्रतीक मानली जाते.
View this post on Instagram
7 अंक असलेले लोक भाग्यवान असतात आणि त्यांना प्रचंड यश मिळते.
7,16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 मानला जातो. या मूलांकाचे लोक खूप भाग्यवान मानले जातात. असे म्हटले जाते की 7 मूलांक असलेले लोक जीवनात खूप यश मिळवतात. त्यांचे नशीब खूप मजबूत असते. असे लोक त्यांच्या करिअरमध्ये अनेकदा लक्षणीय प्रगती करतात. ते स्वभावाने मेहनती आणि धार्मिक असतात. त्यांचा देवावर गाढ विश्वास असतो. या लोकांमध्ये प्रत्येक परिस्थितीला त्यांच्या बाजूने वळवण्याची शक्ती असते. ते स्वतंत्र विचारसरणीचे आणि स्वावलंबी असतात.
अशा बऱ्याच कारणांमुळे 7 ही जन्मतारीख आणि या जन्मतारखेवर जन्मलेले लोक भाग्यवान मानले जातात. म्हणून आता कतरिना आणि विकीच्या मुलाची 7 ही जन्म तारीख पाहून फार लकी म्हटलं जात आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)
