Health: वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम, करा हे उपाय

वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करणाऱ्या लोकांनी आपल्या मानसिक आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी योगासने व मेडिटेशन उपयुक्त ठरते.

Health: वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम, करा हे उपाय
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 10:04 AM

नवी दिल्ली – वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करणे (Work from home) हे कल्चर काही नवीन नाही, अनेक जण ते करतात. मात्र कोविडनंतरच्या काळात देशाची अर्थव्यवस्था सुरळीत रहावी यासाठी वर्क फ्रॉम होमची ही संस्कृती अधिक प्रचलित झाली आहे. कोविडच्या काळात अनेक कंपन्यांचे कर्मचारी (employees) घरातून काम करत होते, मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर ऑफीस पुन्हा सुरू झाले. असे असले तरी अद्यापही काही लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना मानसिक ताणाचा (mental stress) सामना करावा लागत आहे.

जे कर्मचारी घरातून काम करत आहेत त्यांना कामासोबतच शारीरिक व मानसिक तणावही सहन करावा लागत आहे, ज्याचा सामना करणे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, वर्क फ्रॉम होममध्ये जास्त काम करावे लागणे आणि काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ न मिळणे, यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. अशावेळी घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शारीरिक आणि मानसिक ताण दूर करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ते अत्यंत धोकादायक ठरू शकतं.

एचटी लाइफस्टाइलला दिलेल्या मुलाखतीत क्लार्क्स एक्झोटिका येथील असिस्टंट मॅनेजर शाली श्रीनिवास यांनी सांगितले की, एखादी व्यक्ती आयुष्यभर शारीरिक आणि मानसिक तणावाने ग्रस्त असते. त्याला सामोरे जाण्यासाठी मेडिटेशन व योग हे उत्तम मार्ग आहेत.

हे सुद्धा वाचा

मालिश केल्याने दूर होऊ शकतो मानसिक तणाव

वेगवेगळ्या प्रकारच्या मालिशमुळे तणावाचा सामना करण्यास मदत होते, असेही शाली श्रीनिवास यांनी सुचवले. उदाहरणार्थ, विविध प्रकारच्या सुगंधित तेलासह उपचार करणाऱ्या अरोमा थेरेपीमुळे रक्ताभिसरण सुधारणे, त्वचा योग्य ठेवणे, झोपेची गुणवत्ता सुधारणे आणि तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत होणे असे फायदे मिळतात.

डोक्यावर कोमट तेलाचे थेंब सोडत राहणे, हा असा एक उपाय आहे ज्यामुळे तणाव, मायग्रेन आणि निद्रानाश दूर होण्यास मदत होते. स्पा थेरपी हा तणाव दूर करण्याचा आणि त्वरित आराम मिळविण्याचा एक चांगला मार्ग आहे. तसेच जीममध्ये जाऊन व्यायाम करणे, सायकलिंग, जॉगिंग, मेडिटेशन करणे यासारख्या उपायांमुळेही आराम मिळतो.

अशी घ्या मानसिक आरोग्याची काळजी

– दररोज मेडिटेशन व प्राणायाम करावे.

– जे काम अत्यंत महत्वाचे आहे किंवा तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे, त्यांना प्रथम प्राधान्य द्यावे.

– जेव्हा आपली मनस्थिती ठीक नसेल तेव्हा काम करू नये किंवा थोडा ब्रेक घ्यावा. त्यावेळी कामासंदर्भात चर्चा करू नये.

– 8 ते 10 तासांत काम करावे. त्यापुढे अतीवेळ काम करणे टाळावे.

– दिवसभरात काम करताना थोडा-थोडा ब्रेक घ्यावा.

– सतत एका जागी बसून काम करू नका, थोड्या-थोड्या वेळाने उठावे, गालचाल करावी.

– दररोज मेडिटेशन करावे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.