AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Natural Fat Burner Foods : ‘हे’ पदार्थ आहेत नैसर्गिक फॅट बर्नर, कराल सेवन तर सहज कमी होईल चरबी

आजकाल बहुतांश लोक हे वजनवाढीच्या समस्येने त्रस्त असलेले दिसतात. त्यासाठी अनेक उपायही करतात, पण दरवेळेस यश मिळतेच असे नाही. काही पदार्थांच्या सेवनाने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन घटवण्यास मदत होते.

Natural Fat Burner Foods : 'हे' पदार्थ आहेत नैसर्गिक फॅट बर्नर, कराल सेवन तर सहज कमी होईल चरबी
Image Credit source: Freepik
| Updated on: Feb 22, 2023 | 11:27 AM
Share

नवी दिल्ली : आजकाल बहुतांश लोक वजन वाढण्याच्या (weight gain) समस्येने त्रस्त आहेत. त्यासाठी अनेक उपायही करतात, पण दरवेळेस यश मिळतेच असे नाही. बरेचसे लोक आपले वाढते वजन कमी करण्यासाठी वेळही काढू शकत नाहीत, ज्यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी (extra fats) जमा होते. मात्र काही पदार्थांच्या सेवनाने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन घटवण्यास मदत होते. खरंतर असे अनेक नैसर्गिक फॅट बर्नर पदार्थ (natural fat burner food) आहेत, जे चयापचय म्हणजेच मेटाबॉलिज्म वाढवून वजन कमी करण्यास मदत करू शकतात. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया.

मासे

एका रिपोर्टनुसार, फॅटी फिशमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड आढळते, जे शरीरातील चरबी लवकर बर्न करण्यास मदत करते. अशा माशांमध्ये प्रथिने भरपूर असतात, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळापर्यंत अन्न खाण्याचे क्रेव्हिंग किंवा लालसा होत नाही आणि पचनक्रियेदरम्यान तुमचा चयापचय दर अर्थात मेटाबॉलिज्म रेटही वाढतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात फॅटी माशांचे सेवन करून वजन कमी करू शकता.

अंडी

अंड्यांचे सेवन करूनही तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. हा एक नैसर्गिक फॅट बर्नर पदार्थ आहे, ज्यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. एका अभ्यासानुसार, नाश्ता करताना अंडी खाल्ल्यास पोट भरण्यास आणि भूक कमी होण्यास मदत होते. त्यामुळे फॅट्स तर बर्न होतात पण आपल्या हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.

सिमला मिरची

सिमला मिरची हे देखील नैसर्गिक फॅट बर्नर असून वजन कमी करण्यासाठी त्याचे सेवन करणे अतिशय फायदेशीर ठरते. सिमला मिरची खाल्ल्याने शरीरातील कोणत्याही प्रकारची जळजळ कमी होते, मेटाबॉलिज्म रेट सुधारतो, तसेच आपली भूक नियंत्रित होते. याचे सेवन केल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते आणि जास्त खाणे टाळले जाते.

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑइलचा नियमित वापर केल्याने तुमचे वजनही नियंत्रित राहू शकते. हे देखील नैसर्गिक फॅट बर्नर फूडच्या श्रेणीत येते, जे हेल्दी फॅट तर आहेच, पण त्याच्या सेवनाने आपले पोट जास्त काळ भरलेले राहते. तसेच मेटाबॉलिज्म रेटही वाढवण्यास मदत होते.

ग्रीन टी

ग्रीन टी (Green Tea) हा आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो. जर तुम्ही सकाळी याचे सेवन केले तर दिवसभर तुमचे मेटाबॉलिज्म चांगले चालेल. वास्तविक, ग्रीन टीमध्ये कॅफिन आणि ईजीसीजी आढळतात, जे वजन कमी करण्यास, कॅन्सर आणि हृदयविकारापासून बचाव करण्यास मदत करतात. तसेच ते कॅलरीज बर्न करण्याचे काम करते.

कॉफी

कॉफी (Coffee) प्यायला आपल्यापैकी बहुतेक लोकांना आवडते. त्याने फ्रेश तर वाटतेच पण वजन कमी करण्यासाठीही कॉफीचे सेवन करता येते. जर तुम्ही सकाळी साखर किंवा दुधाशिवाय कॉफीचे सेवन केले तर शरीरातील चरबी जाळण्यास मदत होते. खरंतर, ते त्यात असलेला कॅफीन हा घटक मेटाबॉलिज्म रेट वाढवण्याचा काम करतो, ज्यामुळे नैसर्गिक रित्या फॅट्स बर्न होतात व वजन कमी होण्यासही मदत मिळते.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.