‘या’ 5 प्रकारे स्वत:ला ठेवा तणावमुक्त, मानसिक आरोग्य राहील चांगले
आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे असे म्हटले जाते की जर तन आणि मन निरोगी असेल तर शरीर देखील निरोगी राहील. चांगले मानसिक आरोग्य राखण्यासाठी तणावापासून दूर राहणे खूप महत्वाचे आहे. तर मग तुम्ही तणाव मुक्त कसे राहु शकता ते आपण आजच्या या लेखातुन जाणून घेऊयात.

बदलत्या जीवनशैलीत आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे कारण जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुम्ही तुमचे वैयक्तिक जीवनाबरोबरच प्रोफेशनल जीवन चांगल्या प्रकारे बॅलेंस करू शकता. अशातच तुम्ही या सर्वांमध्ये ताणतणावात राहीलात तर तुम्हाला हळूहळू चिंता आणि नैराश्य येऊ शकते, ज्याचा शारीरिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वाढता लठ्ठपणा, जास्त भूक लागणे किंवा अजिबात भूक न लागणे, पोट आणि डोकेदुखी यासारख्या समस्या देखील उद्भवू लागतात, म्हणून कामाच्या आणि नातेसंबंधांच्या जबाबदाऱ्यांमध्ये तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.
आजच्या काळात कामाचा ताण तसेच खाण-पिण्याच्या सवयी बदलणे, त्याचबरोबर पुढे जाण्याची स्पर्धा इतकी वाढली आहे की कधीकधी आरोग्याकडे लक्ष देणे कठीण होते. तरूणाई देखील तणावाचे बळी होऊ लागले आहेत, ज्यामुळे लहान वयातच अनेक आजार त्यांना घेरतात. यासाठी आजच्या लेखात आपण अशा काही सोप्या टिप्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्या तुम्हाला तणावापासून दूर राहण्यास मदत करतील आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या बरे वाटेल.
या विश्रांतीच्या ट्रिक्स करा ट्राय
चांगले मानसिक आरोग्यासाठी दररोज किमान 15 ते 20 मिनिटे स्वत:साठी वेळ काढा. अशातच या काळात ध्यान करा. श्वासोच्छवासाचे व्यायाम करा. तुम्ही अनुलोम-विलोम, भ्रस्त्रिका इत्यादी प्राणायाम करू शकता. जेव्हा तुम्ही तणावात असाल तेव्हा डोळे बंद करा, खोल श्वास घ्या आणि श्वास सोडा. यामुळे तुम्हाला आराम मिळतो. अर्धपद्मासन, पश्चिमोत्तानासन, बालासन इत्यादी काही योगासने करणे देखील फायदेशीर ठरेल.
भरपूर झोप घ्या
जर तुम्हाला स्वतःला तणावमुक्त ठेवायचे असेल तर झोपेबाबत निष्काळजी राहू नका. सात ते आठ तासांची झोप घेणे महत्वाचे आहे. याशिवाय, तुम्ही योग्य वेळी झोपता आणि योग्य वेळी उठता हे देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यासाठी रात्री 7 ते 8 च्या दरम्यान जेवणे आणि 10 च्या सुमारास झोपण्याची सवय लावा.
तुमच्या आवडत्या गोष्टी करा
जेव्हा आपण आपल्या आवडीचे काहीतरी करतो तेव्हा आपल्याला आतून आनंद होतो. जर तुम्हाला बागकाम करायला आवडत असेल तर आठवड्यातून एकदा हे काम करा. जर तुम्हाला पुस्तके आवडत असतील तर तुमचा आवडत्या लेखकाचे पुस्तक वाचा. गाणे ऐका. यामुळे तुमचे कौशल्य वाढेल आणि तुम्ही अधिक आनंदी देखील व्हाल.
स्वतःची काळजी घेणे महत्वाचे
स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी, स्वतःची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. यामध्ये तुम्ही फिटनेस, त्वचेची काळजी घेण्यापासून ते केसांची काळजी घेण्यापर्यंत आणि स्वतःवर उपचार करण्यापर्यंत सर्व काही करू शकता. यामुळे तुमच्यामध्ये आत्मविश्वासही निर्माण होईल, कारण जेव्हा आपण चांगले दिसतो तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल चांगले वाटते.
निसर्गाच्या सानिध्यात राहणे देखील महत्त्वाचे
कामाची धावपळ, वैयक्तिक आयुष्यातील जबाबदाऱ्या या सगळ्यात स्वतःला भेटण्यासाठी वेळच उरला नाही असे वाटते. यासाठी, वेळोवेळी निसर्गात पूर्णपणे एकटे काही वेळ घालवणे महत्वाचे आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही एकट्याने बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
