AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसभर ‘कॉम्युटर स्क्रीन’ समोर बसताय का ? सतत एकाच पोझीशनमध्ये बसल्याने, वाढतो मृत्यूचा धोका! ‘डेस्क’ वर काम करणार्यांनो आजच बदला तुमची बसण्याची पद्धत!

बहुतांश लोकांना तासनतास कॉम्प्युटर डेस्कवर बसून ऑफिसचे काम करावे लागते. काही जण, अभ्यासही करतात. मात्र, असे करणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. साडेनऊ तासांपेक्षा जास्त वेळ बसुन काम केल्यास मृत्युचा धोका वाढतो. असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे, आपण संगणकासमोर बसण्याची योग्य पद्धत कोणती आहे? कस बसावं याबाबत जाणून घेणे गरजेचे आहे.

दिवसभर ‘कॉम्युटर स्क्रीन’ समोर बसताय का ? सतत एकाच पोझीशनमध्ये बसल्याने, वाढतो मृत्यूचा धोका! ‘डेस्क’ वर काम करणार्यांनो आजच बदला तुमची बसण्याची पद्धत!
कॉम्प्युटरImage Credit source: tv9
| Updated on: Jun 18, 2022 | 7:43 PM
Share

ऑफिसचे काम असो किंवा अभ्यास, अधुनिक काळात तास्‌तास कॉम्प्युटर स्क्रीनसमोर (In front of the computer screen) डोळे ताणत काम करावे लागते, त्यातूनच अनेक शारीरिक समस्या उद्भवू लागतात. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, जे लोक दिवसात साडेनऊ तासांपेक्षा जास्त वेळ एकाच पोझीशनमध्ये बसतात (seating) त्यांचा मृत्यूचा धोका वाढतो. जे लोक काम किंवा अभ्यासादरम्यान बराच वेळ एकाच स्थितीत बसतात त्यांच्यामध्ये पार्श्वभागाशी संबंधित दुखण्याच्या समस्या सामान्य होतात. मान, पाठ, गुडघा, खांदा, नितंब, पाठीच्या खालच्या भागात वेदना आणि इतर समस्या सुरू होतात. जास्त वेळ एकाच जागी बसल्याने होणारा त्रास टाळण्यासाठी काही लोक आरामदायी फर्निचरचा (Comfortable furniture)  वापर करतात, तर काही लोक स्ट्रेचिंग आणि व्यायामाचा अवलंब करतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर संगणकावर योग्य पोझिशन मध्ये बसल्यास, या समस्या टाळू शकतात.

बसण्याची योग्य स्थिती

तिरकस खांदे, तिरकी मान आणि वक्र पाठीचा कणा. संगणक डेस्कवर बसण्याचे हे सर्व चुकीचे मार्ग आहेत. बराच वेळ असे बसून कामाची सवय असल्याने शरीरात दुखणे, बैठक-पार्श्वभागात बिघाड संभवतो, पाठीच्या कण्याला दुखापत होणे, नैराश्य, चयापचय क्रिया मंदावणे. अशा समस्या उद्भवतात त्या टाळण्यासाठी, योग्य पोझिशन निवडून घेऊन बसले पाहिजे आणि संगणकावर व्यवस्थित बसण्यासाठी डेस्क आणि खुर्चीच्या उंचीकडे लक्ष दिले पाहिजे.

खुर्चींची उंची कीती असावी

कॉम्युटर डेस्कवर बसताना, खुर्चीची उंची अशी असावी की तुमचे पाय जमिनीला स्पर्श करतील आणि गुडघ्याच्या मागील बाजूस 90 अंशाचा कोन तयार होईल. नितंबांना नेहमी खुर्चीच्या मागच्या बाजूला चिकटलेले ठेवा. मान नेहमी मणक्याच्या रेषेत असावी म्हणजे स्क्रीन पाहण्यासाठी मान खाली टेकली जाऊ नये. जर, स्क्रीन डोळ्याच्या वर 1-2 इंच राहिली तर ते देखील योग्य होईल. संगणकाच्या स्क्रीनपासून नेहमी किमान 20 इंच दूर बसा. खांदे शिथिल ठेवा आणि त्यांना पुढे किंवा मागे वाकवू नका

मध्ये मध्ये ब्रेक घ्या

तज्ज्ञांच्या मते, ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ कॉम्प्युटर स्क्रीनसमोर बसू नये आणि प्रत्येक ३० मिनिटांनी स्क्रीनपासून काही वेळाने दूर गेले पाहिजे. अशा परिस्थितीत, स्नायू आणि मांसपेशींमध्ये कडकपणा राहणार नाही आणि थकवा येणार नाही. यासोबतच रक्ताभिसरणही योग्य होईल, जे उत्तम आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

आरामदायी खुर्चीवर बसा

संगणकावर काम करताना, नेहमी योग्य आणि आरामदायी खुर्चीवर बसावे. खुर्ची नेहमी शास्रोक्त पद्धतीने आरामदायी, ॲडजेस्टेबल असावी. खुर्चीला नेहमी बॅकरेस्ट असावा जो. पाठीच्या वरच्या आणि खालच्या बाजूस आधार देतो. या आधाराने, मणक्याचा वाक योग्य दिशेत राहील. यासाठी, एर्गोनॉमिकली डिझाइन केलेल्या खुर्च्यांना प्राधान्य द्यावे, ज्या खास डेस्कवर बसण्यासाठीच बनवलेल्या आहेत. खुर्चीची उंची, आर्मरेस्टची उंची आणि बॅकरेस्ट ॲडजेस्टेबल करण्यासाठी नेहमी सोय असली पाहिजेत. खुर्चीतील डोके हेडरेस्ट (डोक्याला आधार देणारा भाग) असावा. यासोबतच खुर्ची मऊ आरामदायी पद्धतीने कुशन केलेली असावी, जेणेकरून बसताना अल्लाददायी वाटेल.

व्यायाम आणि स्ट्रेचिंग

काही वेळ बसल्यानंतर पाठीचा खालचा भाग, खांदे, सांध्यामध्ये कडकपणा येतो. आता, तुम्ही कॉम्युटर डेस्कवर बसूनही काही व्यायाम आणि स्ट्रेचिंग करू शकता. असे केल्याने तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि स्नायूंमध्ये जडपणा येणार नाही.

माऊस नेहमीच दूर ठेवू नका

माऊसच्या चुकीच्या जागेमुळे बसण्याची स्थिती बदलू शकते. जर माऊसची स्थिती बराच काळ चुकीची राहिली तर ते, तुम्हाला पुढे झुकण्यास किंवा हात लांब हलवण्यास भाग पाडेल, त्यामुळे माऊसला जास्त दूर ठेवू नका तो, कीबोर्डजवळच असावा. माऊस वापरताना, तुमचे मनगट सरळ ठेवा, देान्ही हात तुमच्या शरीराच्या जवळ ठेवा आणि तुमचे हात तुमच्या कोपराच्या पातळीपेक्षा किंचित खाली ठेवा.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.