AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health News : नाष्ट्यामध्ये हे पदार्थ खात असाल तर वेळीच व्हा सावधान, पोटदुखीचा होईल त्रास!

Morning Breackfast News : काही आरोग्यदायी पदार्थांमुळे आपल्याला अनेक वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आता आपण कोणते पदार्थ नाष्ट्यामध्ये खाल्ले पाहिजेत आणि कोणते नाहीत याबाबत जाणून घेणार आहोत.

Health News : नाष्ट्यामध्ये हे पदार्थ खात असाल तर वेळीच व्हा सावधान, पोटदुखीचा होईल त्रास!
Breakfast benefits
| Updated on: Sep 06, 2023 | 11:39 PM
Share

मुंबई : दररोज सकाळी नाष्टा करणं हे खूप गरजेचं असतं. डॉक्टर देखील प्रत्येकाला सकाळी नाष्टा करण्याचा सल्ला देतातच. जर सकाळी नाष्टा केला नाही तर अनेक शारीरिक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. त्यामुळे सकाळच्या वेळी नाश्ता करणे खूप गरजेचे असते. तर बहुतेक लोक सकाळी नाष्टा करतातच, पण काही लोक आरोग्यदायी पदार्थ खात नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. पण आता काही असेही आरोग्यदायी पदार्थ आहेत जे शरीरासाठी चांगले नसतात.

सकाळी नाष्ट्यामध्ये कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे? सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही रवा, बाजरी, गहू, नाचणी यांपासून बनवलेला दलिया खाऊ शकता. तसेच मुगडाळ आणि तांदळाची खिचडी देखील खाऊ शकता. त्याचबरोबर घरगुती आयुर्वेदिक स्मुदीचा देखील तुम्ही नाष्ट्यामध्ये समावेश करू शकता. असा हलका आणि पौष्टिक आहार तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये आवर्जून घेतला पाहिजे. यामुळे तुमची अनेक शारीरिक आजारांपासून सुटका होते.

नाश्त्यामध्ये कोणते पदार्थ खाल्ले नाही पाहिजेत?

1. ओट्स खाणे ठरू शकतं घातक – सकाळच्या वेळी नाष्टामध्ये बहुतेक लोक ओट्स, कॉन्फ्लेक्स मोठ्या प्रमाणात खाताना दिसतात. पण हेच ओट्स तुमच्या शरीराला घातक ठरू शकतात. नाष्टा मध्ये ओट्स खाल्ल्यानंतर पचनाची समस्या निर्माण होऊ शकते. ते शरीरात नीट पचत नाहीत त्यामुळे आपली पचनक्रिया बिघडते आणि आपल्या शरीरात विषारी पदार्थ देखील तयार होऊ शकतात, त्यामुळे ओट्स खाणे टाळावे.

2. फळ आणि दूध एकावेळी घेणे चुकीचे – बहुतेक लोक सकाळी नाष्टा करताना फळ आणि दुधाचे सेवन करताना दिसतात. तर काही लोक फळांमध्ये दूध मिसळून पितात. पण फळाचे आणि दुधाचे हेच मिश्रण तुमच्या शरीराला हानिकारक ठरू शकते. आणि दुधाचे मिश्रण हे पोटासाठी जड असते. त्यामुळे पोटाच्या अनेक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे फळ आणि दुधाचे सेवन एकाच वेळी करू नका.

3. थंड पदार्थांचं सेवन करू नका – सकाळच्या वेळी थंड पदार्थांचे सेवन करणं घातक ठरू शकते. बहुतेक लोक सकाळच्या वेळी थंड स्मुदी किंवा फळांचा रस पितात. पण हेच थंड पदार्थ पिल्यामुळे तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होऊ शकतो.  पचनाच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सकाळी फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न किंवा थंड पेय पिणे टाळावे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.