AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यात मोठा कट?, या देशाच्या राष्ट्रपतींना लगेचच बोलावले अमेरिकेत, घडामोडींना वेग

डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून भारताबद्दल धक्कादायक विधाने करताना दिसत आहेत. त्यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला आहे. मात्र, भारताने अमेरिकेच्या या निर्णयाला जोरदार विरोध केला. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यात मोठा कट?, या देशाच्या राष्ट्रपतींना लगेचच बोलावले अमेरिकेत, घडामोडींना वेग
| Updated on: Aug 16, 2025 | 2:06 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्का येथे बैठक झाली. ही बैठक तब्बल तीन तास सुरू होती. या बैठकीचा मुख्य उद्देश हा युक्रेनचे युद्ध होते. मात्र, यासोबतच अनेक मुद्दांवर चर्चा झाली. बैठकीच्या अगोदर डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट रशियाला मोठी धमकी दिली होती की, त्यांना हे युद्ध बंदच करावे लागेल नाही तर वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल. मात्र, प्रत्यक्षात या बैठकीनंतर युद्धाबाबत कोणत्याही प्रकारची घोषणा झाली नाही. अमेरिकेच्या हातावर तुरी देऊन व्लादिमीर पुतिन हे निघून गेले आहेत आणि तोडगा निघू शकला नाही.

या बैठकीनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींना वेग आल्याचे बघायला मिळतंय. पुतिन यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांना फोन केला. पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीत नेमके काय घडले आणि काय चर्चा झाली याची माहिती दिली. फक्त माहितीच नाही तर त्यांना लगेचच अमेरिकेला देखील बोलावले आहे. जेलेंस्की हे सोमवारी 18 ऑगस्ट 2025  रोजी अमेरिकेच्या दाैऱ्यावर असणार आहेत.

वोलोदिमीर जेलेंस्की यांच्यासाठी यापूर्वीची अमेरिका दाैरा अत्यंत वाईट ठरला होता. बैठक अर्ध्यामध्येच सोडून ते थेट निघून केले होते. त्यानंतर आता परत ते अमेरिकेला जाणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर लगेचच जेलेंस्की यांना फोन करून अमेरिकेला बोलावले आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यामधील युद्धाबाबत मोठ्या घडामोडी घडताना सध्या दिसत आहे. भारतावर अमेरिकेकडून टॅरिफ लावल्यानंतर वोलोदिमीर जेलेंस्की यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता.

अमेरिकाने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर मोठा टॅरिफ लावला आहे. मात्र, भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. त्यामध्येच आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी वाढल्या आहेत. पुढील दोन ते तीन आठवड्यांमध्ये टॅरिफबद्दलची देखील भूमिका अमेरिकेकडून स्पष्ट केली जाणार आहे. जर अमेरिकेने त्यांची टॅरिफबद्दलची भूमिका बदलली नाही तर भारत देखील अमेरिकेच्या कंपन्यांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

Follow Us
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त.
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका.
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ.
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील.
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?.
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?.
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक...
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर.....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर......
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र.
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार..
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार...