AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भारत-पाक युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईल…’, पाकिस्तानी राजकारणी नेत्याचा व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तान नॅशनल असेम्बलीचे सदस्य असलेल्या अफजल खान मारवात यांना पत्रकारांनी भारत-पाकिस्तान युद्धाबाबत प्रश्न विचारला. भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यावर तुम्ही लढणार का? त्यावर त्यांनी दोन्ही देशांमध्ये युद्ध झाल्यावर मी इंग्लंडमध्ये जाईल.

'भारत-पाक युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईल...', पाकिस्तानी राजकारणी नेत्याचा व्हिडिओ व्हायरल
शेर अफजल खान मारवत
| Updated on: May 04, 2025 | 12:47 PM
Share

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली. भारताने सिंधू पाणी करार रद्द केला. तसेच आयात-निर्यातीवर बंदी आणली. पाकिस्तानविरोधात अनेक कठोर उपाय भारताने केल्यानंतर लष्करी कारवाईसाठी भारतीय लष्कराला खुली छूट दिली आहे. आता भारत पाकिस्तानवर मोठी कारवाई करु शकतो, अशी चर्चा सध्या सुरु आहे. त्या चर्चेत पाकिस्तानी राजकारणी शेर अफजल खान मारवात यांचे वक्तव्य व्हायरल झाले आहे.

पाकिस्तान नॅशनल असेम्बलीचे सदस्य असलेल्या अफजल खान मारवात यांना पत्रकारांनी भारत-पाकिस्तान युद्धाबाबत प्रश्न विचारला. भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यावर तुम्ही लढणार का? त्यावर त्यांनी दोन्ही देशांमध्ये युद्ध झाल्यावर मी इंग्लंडमध्ये निघून जाईल, असे उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी पावले उचलायला हवे होते? असा प्रश्न मारवत यांना पुन्हा विचारण्यात आला. त्यावर मारवात म्हणतात, मोदी माझ्या आत्याचा मुलगा आहे का? ज्यामुळे मी सांगितल्यावर ते माघार घेतील. त्यांचे हे उत्तर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. नेटकरी म्हणतात, पाकिस्तानी राजकारण्यांनाही आपल्या लष्करावर विश्वास राहिला नाही.

कोण आहे मारवत?

शेर अफजल खान मारवत हे एक ज्येष्ठ पाकिस्तानी राजकारणी आहेत. ते माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) मध्ये होते. परंतु त्यांनी अनेक वेळा पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर टीका केली आहे. ज्यामुळे इम्रान खान यांनी त्यांना पदांवरून काढून टाकले.

सलग दहाव्या दिवशी गोळीबार

दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव कायम आहे. शनिवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने सलग दहाव्या दिवशी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर भागात गोळीबार केला. दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेवर (एलओसी) आजूबाजूच्या भागात लहान शस्त्रांनी गोळीबार केला. त्याला भारतीय सैन्याने दुप्पट ताकदीने प्रत्युत्तर दिले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.