नरेंद्र मोदी-डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोन कॉलद्वारे चर्चा, दोघांनीही भविष्यात…व्यापार कराराविषयी मोठी अपडेट समोर!
अमेरिका आणि भारत यांच्यात द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा चालू आहे. असे असतानाच आता नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात महत्त्वाचा कॉल झाला आहे. तशी माहिती भारत सरकारकडून देण्यात आली आहे.

Narendra Modi Donald Trump Call : सध्या जागतिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. प्रत्येक देश उद्योग, व्यापार तसेच अन्य क्षेत्रांत स्वयंपर्ण होण्यासाठी प्रयत्न करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फस्ट’ या धोरणामुळे तर अनेक देशांच्या जागतिक धोरणांमध्ये मोठा बदल झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफमुळे तर भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापरविषयक तसेच राजकनयिक संबधांमध्ये काहीसा दुरावा आला आहे. हेच संबंध सुरळीत व्हावेत यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापारविषक करार करण्यासाठी वाटाघाटी चालू आहे. त्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. असे असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे समकक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोन कॉलद्वारे महत्त्वाची चर्चा झाली आहे. या चर्चेमध्ये द्विपक्षीय व्यापारविषयक कराराच्या प्रगतीबाबत दोन्ही नेत्यांनी विचारांची देवाणघेवाण केल्याची माहिती मिळत आहे.
नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?
मिळालेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात एक फोन कॉल झाला आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. प्रामुख्याने दोन्ही नेत्यांत व्यापक अशा जागतिक दोरणात्मक भागिदारीवर चर्चा करण्यात आली आहे. यासह व्यापार, महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान, उर्जा, संरण, सुरक्षा आदी क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावरही चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील समान आव्हाने आणि हितसंबंधांवर जवळून सहकार्य करण्याबाबतही महत्त्वाची चर्चा झाली आहे.
दोन्ही नेत्यांनी केले समाधान व्यक्त
या चर्चेमध्ये दोन्ही देशांत चालू असलेल्या व्यापक जागतिक धोरणात्मक भागिदारीच्या चर्चेमधील प्रगतीची सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच सध्या या क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीवर समाधान व्यक्त केले. सर्वच क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत करण्यावरही समाधान व्यक्त करण्यत आले.
संपर्कात राहण्यावरही सहमती
या चर्चेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात वेगवेगळ्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा झाली आहे. यासह दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहण्यावरही सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारात वाढ होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
