कंगाल पाकिस्तानला लागली मोठी लॉटरी, या मागास भागात मोठे घबाड सापडल्याचा दावा
खैबर पख्तूनख्वा आणि बलूचिस्तान दोन्ही पंजाबप्रांताच्या तुलनेत खूपच मागासलेले आहेत. त्यामुळे या राज्यात पंजाब प्रांताच्या विरोधात नाराजी आहे. आता येथे मोठा संपत्ती साठा सापडल्याचा दावा केला जात आहे.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा या मागास भागात तेल आणि गॅसचा साठा सापडल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी यासंदर्भात देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की यासाठ्यामुळे पाकिस्तानचा परकीय चलनसाठी मजबूत होईल. आणि आयातीवर कमी खर्च करावा लागेल. पाकिस्तानी एजन्सींनी दावा केला आहे की खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या कोहट जिल्ह्याच्या नश्पा ब्लॉकमध्ये तेल आणि गॅसचे भंडार सापडले आहे. येथून प्रति दिन 4100 बॅरल कच्चे तेल निघू शकते. याशिवाय 10.5 मिलियन क्यूबिक फीट गॅस देखील काढला जाऊ शकतो. पाक सरकारचे म्हणणे आहे की हे यश त्यांच्या देशासाठी खूप मोठे आहे. त्यामुळे आयातीवर अलंबित्व कमी होऊ शकते.
पीएम शहबाज शरीफ यांनी पेट्रोलियम आणि गॅस सेक्टरच्या एका उच्च स्तरीय मिटींगमध्ये सांगितले की स्थानिक स्तरावर यांच्या शोधामुळे आपल्याला आयात कमी करावी लागेल. शहबाज शरीफ यांनी सांगितले की यामुळे आपला परकीय चलन भंडार मजबूत होईल आणि तेल आणि गॅसच्या खरेदीवर खर्च कमी करण्यासाठी मदत मिळेल. पाकिस्तानची ऑईल एण्ड गॅस डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडने नश्पा ब्लॉकमध्ये गॅस आणि तेलचे संशोधन केल्याचे म्हटले आहे. कंपनीचे सांगितले की पीएम शहबाज शरीफ यांनी आम्हाला आणि अन्य एजन्सींना याच्या शोधासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मिटींगमध्ये कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की यावर्षी ग्राहकांना पर्याप्त गॅस मिळाली आहे. आता आपले टार्गेट आहे की जून 2026 पर्यंत 3.5 लाख नवीन गॅस कनेक्शन वाटायचे आहे. पाकिस्तान याला मोठे यश म्हणून पाहात आहे. याआधी देखील बलूचिस्तानात पाकिस्तानने अनेकदा गॅस आणि ऑईल साठ्यांचा शोध केला आहे. परंतू खैबर पख्तूनख्वापासून बलुचिस्तानपर्यंतच्या लोकांनी या गोष्टीला विरोध केला आहे. पाकिस्तान आमच्या नैसर्गिक साठ्यांचा वापर करत आहे मात्र त्यातून मिळणाऱ्या पैशांचा या विभागाच्या विकासासाठी खर्च करत नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
नैसर्गिक साठ्यानंतरही हा भाग मागासलेला का ?
खैबर पख्तूनख्वा आणि बलूचिस्तान दोन्ही पंजाबच्या तुलनेत एकदम मागासलेले आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये पंजाबी विरोध प्रबळ आहे. येथील लोकांचे म्हणणे आहे की सैन्यात, राजकारणात आणि प्रशासनात पंजाबी लोकांचे प्रभुत्व आहे. परंतू त्यांच्या साधन संपत्तीचा वाटा त्यांना मिळत नाही.
