भारत-पाकिस्तानाने एकमेकांना का सोपवली आण्विक स्थळांची यादी ?, ऑपरेशन सिंदूरनंतर मोठे पाऊल
पहलगाम अतिरेकी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर हे भारत आणि पाकिस्तान संबंधात तणाव आला होता. ज्यानंतर भारताने आता डिप्लोमॅटिक आणि स्ट्रेटेजिक पावले उचलली आहेत.

भारत आणि पाकिस्तानने गुरुवारी एका द्विपक्षीय कराराअंतर्गत आपल्या न्युक्लिअर इंस्टॉलेशनची यादी एकमेकांना सोपवली आहे. ही यादी दोन्ही बाजूंना एकमेकांच्या आण्विक स्थळांवर हल्ला करण्यापासून रोखणाऱ्या करारांतर्गत सादर करण्यात आली आहे. ही परंपरा तीन दशकांपासून चालू आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अशी यादी दोन्ही राष्ट्रे एकमेकांना देत असतात. गेल्या मे महिन्यात पहलगामवरील अतिरेकी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशातील नातेसंबंध बिघडले होते. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान आण्विक स्थळांची यादी एकमेकांना दिली आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आज नवी दिल्ली आणि इस्लामाबाद येथे एक साथ डिप्लोमॅटीक चॅनलद्वारा एकमेकांच्या न्यूक्लिअर इंस्टॉलेशन आणि फॅसिलिटीची यादी एकमेकांना सोपवण्यात आल्याचे गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान एकमेकांच्या न्युक्लिअर इंस्टॉलेशन आणि फॅसिलिटीवर हल्ला न करण्याच्या करारावर ३१ डिसेंबर १९८८ रोजी हस्ताक्षर झाले होते आणि पहिल्यांदा २७ जानेवारी १९९१ रोजी हा करार लागू झाला होता.
३५ व्यांदा दोन्ही देशांनी एकमेकांना यादी दिली
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की दोन्ही देशांदरम्यान या प्रकारची आण्विक ठिकाणींची यादी ३५ व्यांदा सादर केली आहे. पहिल्यांदा ही यादी १ जानेवारी १९९५ ला सादर केली होती. एकमेकांच्या आण्विक तळ आणि फॅसिलिटीवर हल्ला रोखण्यासाठी केलेल्या करारांतर्गत ही यादी सादर केली गेली. दोन्ही देशातील द्विपक्षीय करारांतर्गत २००८ नुसार नवी दिल्ली आणि इस्लामाबादमध्ये एकसाथ डिप्लोमॅटीक चॅनलद्वारा एकमेकांना कस्टडीतील सिव्हील कैदी आणि मच्छीमारांची यादी देखील सादर करण्यात आली.
मच्छीमार आणि कैद्यांची यादी देखील दिली
भारताने त्याच्या कोठडीतील पाकिस्तानी किंवा पाकिस्तानी असल्याची खात्री असलेल्या ३९१ सिव्हील कैदी आणि ३३ मच्छीमारांची यादी शेअर केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच पाकिस्तानने देखील याच प्रकारे त्यांच्या कस्टडीतील बंद ५८ सिव्हील कैदी आणि १९९ मच्छीमारांची यादी शेअर केली आहे, जे भारतीय आहेत, वा भारतीय असण्याची खात्री आहे असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. भारताने पाकिस्तानला त्यांच्या ताब्यातील शिक्षा पूर्ण केलेल्या १६७ कैद्यांना भारतात पाठवण्याची विनंती केली आहे.
