AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या मुस्लीम देशात आहे वाळवंट, तरी परदेशातून का मागवत आहे रेती ?

आखाती प्रदेशातील मुसलमान देशांमध्ये इतके वाळूचे भंडार असून देखील या देशांना इतर देशातून वाळूची गरज लागत आहे. कोणती हे मुस्लीम देश आणि त्यांना का गरज आहे परदेशी वाळूची पाहुयात...

या मुस्लीम देशात आहे वाळवंट, तरी परदेशातून का मागवत आहे रेती  ?
file photo
| Updated on: Jan 01, 2026 | 4:07 PM
Share

आखाती प्रदेशातले सर्वात मोठे वाळवंटी प्रदेश म्हणून ओळखले जाणारे सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरातला इतर देशांकडून वाळू मागवावी लागत आहे. या देशांकडे वाळूचा कोणताही तुटवडा नसतात. मग या देशात बाहेर रेती आणायची गरज का पडली ? वास्तविक सौदी अरबचे भविष्यातील शहर युएई गगनाला भिडलेल्या इमारती आणि अब्जावधी डॉलरचे मेगा प्रोजेक्ट्स ज्या रेतीची गरज आहे , ती या वाळवंटातून भागत नाही.त्यामुळे या देशांना ऑस्ट्रेलियासारख्या दूरवरील देशातून रेती मागवण्याची वेळ आली आहे. चला तर पाहूयात काय नेमके प्रकरण

वाळवंटातील वाळू निरोपयोगी

वाळवंटातील वाळूचे कण इतके सुक्ष्म असतात की ते सिमेंटसोबत नीट चिकटत नाहीत. त्यामुळे काँक्रीट कमजोर बनते. उंच इमारतीचे वजन पेलू शकत नाहीत. त्यामुळे उंची इमारती, पुल, मेट्रो आणि मोठ्या इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये खास प्रकारची वाळूचा वापर करणे गरजेचे असते.

ऑस्ट्रेलिया बनला रेतीचा मोठा पुरवठादार

ऑस्ट्रेलिया आज जगातला सर्वात मोठा बांधकामाची रेती निर्यात करणारा देश आहे. साल २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने सुमारे २७३ अब्ज डॉलरची रेती निर्यात केली होती. २०२३ मध्ये सौदी अरबने ऑस्ट्रेलियातून सुमारे १.४ लाख डॉलरची नैसर्गिक बांधकाम योग्य रेती खरेदी केली आहे. हा ट्रेंड साल २०२४ मध्येही सुरु राहिला. खास करुन जेव्हा सौदी अरबने त्यांच्याकडील मोठ्या प्रोजेक्टना गती दिली.

सौदी अरबचे व्हिजन २०३०, निओम सिटी, द लाईन, रेड सी प्रोजेक्ट आणि किद्दिया सारख्या प्रोजेक्टमध्ये मोठ्या प्रमाणावर उच्च गुणवत्तेच्या काँक्रीटची मागणी असते. या प्रोजेस्ट्समध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड शक्य नसते. त्यामुळे परदेशातून रेती आयत करणे ही सौदी अरबची मजबूरी बनली आहे.

बुर्ज खलिफाची कहाणी देखील हीच –

जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलीफा यांच्या निर्मिती देखील स्थानिय वाळवंटाचील रेतीचा वापर केलेला नाही. या इमारतीला बांधायला कोट्यवधी लिटर काँक्रीट, हजारो टन स्टील आणि विशेष निर्मिती सामग्री लागली. ज्यात ऑस्ट्रेलियातून आयात केलेल्या रेतीचे महत्वाचे योगदान आहे.

UAE आणि कतार देखील याच मार्गावर

केवळ सौदी अरबच नाही तर UAE आणि कतार देखील या समस्येचा सामना करत आहेत. दुबई आणि अबूधाबीची वेगाने बदलती स्कायलाईन, आर्टीफिशियल आयलँड्स आणि बीच प्रोजेक्ट्ससाठी मोठ्या प्रमाणावर समुद्री आणि परदेशी रेतीचा वापर केला गेला. पाम जुमैरा सारख्या प्रोजेक्ट्स स्थानिक रेती साहित्यावर मोठी दबाव होता.

जगातील वाळूचे संकट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार दरवर्षी जगात सुमारे ५० अब्ज टन रेतीचा विक्री केली जाते. ही जगातील सर्वात जास्त जमीनीतून काढली जाणारी नैसर्गिक साधन संपत्ती बनली आहे. अनियंत्रित रेती उत्खननाने नद्यांचा प्रवाह, जैवविविधतेचे नुकसान आणि पर्याटनाची संकट गहिरे बनत चालले आहे. या वाढत्या संकटास पाहून अनेक देश मॅन्युफॅक्चर्ड सँड आणि बांधकाम निर्मिती कचऱ्याचा पुनर्वापर सारख्या पर्यायांवर काम करत आहेत. सौदी अरब देखील अशा पर्यायांवर अभ्यास करत आहे. त्यामुळे भविष्यात रेती संकटाचा सामना करता येईल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...