Tonga Volcano Shockwaves : हाहाकार! भयंकर ज्वालामुखी विस्फोट, हिरोशिमावरील अणूबॉम्बपेक्षाही 600पट जास्त शक्तिशाली

Tonga Volcano Shockwaves : हाहाकार! भयंकर ज्वालामुखी विस्फोट, हिरोशिमावरील अणूबॉम्बपेक्षाही 600पट जास्त शक्तिशाली
Image Courtesy - Reuters

ज्वालामुखीचा उद्रेक हा दुसऱ्या महायुद्धातील 1945 मध्ये जपानच्या हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या 650 हून अधिक ताकदवर असल्याची नोंद करण्यात आली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 20, 2022 | 5:31 PM

न्यूझीलंडपासून दक्षिण प्रशांत महासागरात प्रचंड भयंकर असा ज्वालामुखी विस्फोट झाल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. हा महाप्रलयकारी ज्वालामुखी विस्फोटानंतर (Tonga Volcano Shockwaves) सर्व दिशांमध्ये एक शॉक वेव निर्माण झाली होती. हा धक्का इतका जोरदार होता की तो उत्तर आफ्रिकेपर्यंत जाणवला. या ज्वालामुखीला टोंगा असं नाव देण्यात आलं आहे. या ज्वालामुखीचा विस्फोट तब्बल दोन हजार तीनशे किलोमीटर पर्यंत स्पष्टपणे ऐकू आला होता. यानंतर चार फूट ऊंच त्सुनामीच्या (Tsunami) लाटांचाही तडाखा किनारी भागाला बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ज्वालामुखीच्या विस्फोटानंतर तब्बल बावीस किलोमीटर ऊंच राख उडाली होती. यानंतर हवेत काळा धूर पसरल्यानं वातावरण हे अत्यंत भीतीदायक झालं होतं. ज्वालामुखीच्या विस्फोटानंतर समुद्राच्या आत एक अत्यंत मोठी पोकळी निर्माण होऊन त्सुनामीचा तडाखा बसला. ज्वालामुखी वरच्या बाजूनं तुटल्यामुळे ज्वालामुखीची सगळी राख पाण्यात गेली.

वैज्ञानिकांचं काय म्हणणं?

स्मिथसोनियन ग्लोबल वॉल्कॅनिज प्रोग्रामच्या ज्वालामुखी एक्सपर्ट जॅनिन क्रिपन यांनी म्हटलंय की, जेव्हा ज्वालामुखीचं वेंट म्हणजेच पृथ्वीच्या आतमधील पाण्याशी जोडलेली असते, तेव्हा त्याबद्दल माहिती करुन घेणं, हे फार कठीण होतं. हे अत्यंत धोकादायक असं स्वरुप आहे. याबाबत फारशी माहिती उपलब्ध नसल्याननं कोणतेही अंदाज बांधणं घाईचंच ठरेल. आवाजाच्या गतीसह शॉक वेव संपूर्ण पृथ्वीवर जाणवली असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

1 हजार वर्षात पहिल्यांदाच असं घडतंय

ज्वालामुखीचा उद्रेक हा दुसऱ्या महायुद्धातील 1945 मध्ये जपानच्या हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या 650 हून अधिक ताकदवर असल्याची नोंद करण्यात आली आहे. मागच्या तीस वर्षातील हा सर्वाधित मोठा स्फोट होता. एका शतकाहून अधिक काळ पृथ्वीवर असा स्फोट पाहिल्या नसल्याचंही सांगितलं जातंय.

जवळपास 84 हजार लोक या स्फोटामुळे प्रभावित झाले असण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. यामुळे आता खाण्या-पिण्यासह जगण्याचाही मूलभूत प्रश्न या भागात उद्भवला आहे. ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडनेही या भागातील लोकांसाठी आवश्यक अन्नपुरठवा, औषधं आणि गरजेची साधनसामग्री हवाईमार्गे पाठवली असल्याचं कळतंय.

इतर बातम्या :

उत्तरप्रदेशच्या राजकारणात कंगनाची एन्ट्री, एक फोटो शेअर आणि सोशल मीडियावर चर्चाच चर्चा!

Malegaon | 30 वर्षांपासून बंद असलेली खोली उघडली अन् मानवी कवटी, हाडे सापडली; मालेगावमध्ये खळबळ!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें