AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक उंदीर ठरवणार थेट मानवजातीचे भविष्य, मादी उंदीर अंतराळात गर्भवती, तब्बल 9 पिल्लांना…

चीनकडून एक अंतराळात मोठा प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी मोठा दावा केला. एका उंदीरामुळे संपूर्ण मानवजातीचे भविष्य ठरणार आहे. चक्क अंतराळात हा मोठा प्रयोग करण्यात आला.

एक उंदीर ठरवणार थेट मानवजातीचे भविष्य, मादी उंदीर अंतराळात गर्भवती, तब्बल 9 पिल्लांना...
female mouse
| Updated on: Jan 02, 2026 | 2:30 PM
Share

नुकताच चीनकडून अत्यंत मोठा दावा करण्यात आला. चीनच्या अंतराळ स्थानकात गेलेली एक मादी उंदीर पृथ्वीवर परतली आहे. विशेष म्हणजे तिने अंतराळात तब्बल नऊ पिल्ल्यांना जन्म दिला. ही घटना अंतराळात मानवी वस्ती स्थापन करण्याच्या मानवतेच्या स्वप्नाकडे एक अत्यंत महत्वाचे पाऊस नक्कीच म्हणावे लागेल. थोडक्यात काय तर अंतराळात प्रजनन शक्तीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही आणि बाळही चांगले निरोही जगू शकते, यावरून स्पष्ट होत आहे.  त्यांचे म्हणणे आहे की, अंतराळ प्रवासाचा सस्तन प्राण्यांच्या प्रजनन क्षमतेवर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही. हा प्रयोग चीनच्या शेनझोऊ-21 मोहिमेचा एक भाग होता. 31 ऑक्टोबर रोजी चीनने शेनझोऊ-21 अंतराळयानातून चार उंदीर आपल्या अंतराळ स्थानकावर पाठवले आणि हा प्रयोग केला.

या प्रयोगातील सर्वात खास बाब म्हणजे हे उंदीर पृथ्वीपासून सुमारे 400 किलोमीटर उंचीवर असलेल्या अंतराळ स्थानकावर तब्बल दोन आठवडे राहिले. 14 नोव्हेंबरला ते पृथ्वीवर पुन्हा सुरक्षित परत आले. त्यानंतर 10 डिसेंबर रोजी एका मादी उंदराने नऊ निरोगी पिल्लांना जन्म दिला, ही सर्वात विशेष बाब आहे. मादी उंदराने दिलेल्या 9 पिल्ल्यांपैकी सहा पिल्ले जगली. जो तसा बघायला गेला तर सामान्य दर नक्कीच आहे. सर्वकाही व्यवस्थित असून उंदाराचे पिल्ले व्यवस्थित वाढत आहेत.

चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या संशोधक वांग हाँगमेई यांनी याबद्दल बोलताना म्हटले की, यानंतर आता हे स्पष्ट होते की, कमी कालावधीत अंतराळ प्रवासाचा उंदरांच्या प्रजनन क्षमतेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. मादी उंदर ज्यावेळी अंतराळात होती, त्यावेळी ती गर्भवती होती आणि ती पृथ्वीवर आली, त्यावेळी तिने पिल्लांना जन्म दिला. नक्कीच हा प्रयोग इतका जास्त सोप्पा नव्हता.

शेनझोऊ-20 चे पृथ्वीवर परत येण्यास विलंब झाल्यामुळे उंदरांनी अंतराळात घालवलेला वेळ वाढला आणि संभाव्य अन्नतुटवड्याबद्दल चिंता वाढली होती. अंतराळातील उंदरांच्या अधिवासात पृथ्वीवरील दिवस आणि रात्रीच्या चक्राप्रमाणेच चक्र राखण्यासाठी सकाळी सात वाजता लाईट लावले जात आणि संध्याकाळी सात वाजता बंद केले जात, असल्याचीही त्यांनी माहित दिली.

उंदीर जनुकीयदृष्ट्या मानवांशी खूप साम्य साधतात. वेगाने प्रजनन करतात आणि तणावाला मानवांप्रमाणेच प्रतिक्रिया देतात. या प्रयोगावरून हे स्पष्ट होते की, अंतराळात प्रजननाला कोणतीही समस्या नाही. ते उंदीरावर करण्यात आलेल्या प्रयोगावरून सिद्ध होते. या प्रयोगासाठी अनेक दिवसांपासून मेहनत घेतली जात होती. शेवटी मादी उंदीराने पिल्लांना जन्म दिला.

मयत झालेल्यांवर निवडणुकीची जबाबदारी...संभाजीनगर प्रशासनाचा कारभार उघड
मयत झालेल्यांवर निवडणुकीची जबाबदारी...संभाजीनगर प्रशासनाचा कारभार उघड.
भाजपच्या पूजा मोरेंची उमेदवारी, जुन्या व्हिडीओवरून जरांगेंचा थेट इशारा
भाजपच्या पूजा मोरेंची उमेदवारी, जुन्या व्हिडीओवरून जरांगेंचा थेट इशारा.
पुण्यात सत्तेचा सारीपाट, कोण मारणार बाजी? नागरिकांच्या भावना काय ?
पुण्यात सत्तेचा सारीपाट, कोण मारणार बाजी? नागरिकांच्या भावना काय ?.
अपक्ष उमेदवारालाच लोकांनी घरातच कोंडलं, BJP नं दिलेला AB फॉर्म रद्द अन
अपक्ष उमेदवारालाच लोकांनी घरातच कोंडलं, BJP नं दिलेला AB फॉर्म रद्द अन.
UTS ॲप बंद! लोकल तिकीट अन पासची सुविधा कायमस्वरूपी बंद, पर्याय काय?
UTS ॲप बंद! लोकल तिकीट अन पासची सुविधा कायमस्वरूपी बंद, पर्याय काय?.
हे काय भयानकच प्रकरण! चक्क उमेदवारी अर्जच गिळला... पुण्यात चाललंय काय?
हे काय भयानकच प्रकरण! चक्क उमेदवारी अर्जच गिळला... पुण्यात चाललंय काय?.
पुण्यात गुन्हेगारांना तिकीट अन् अजित पवार यांची सारवासारव
पुण्यात गुन्हेगारांना तिकीट अन् अजित पवार यांची सारवासारव.
नाशिकनंतर पुण्यात दादांची NCP अन् शिंदे सेना भाजपविरोधात एकत्र येणार?
नाशिकनंतर पुण्यात दादांची NCP अन् शिंदे सेना भाजपविरोधात एकत्र येणार?.
सायनमध्ये AB फॉर्मचा झोल अन् भाजप उमेदवारच नॉट रिचेबल
सायनमध्ये AB फॉर्मचा झोल अन् भाजप उमेदवारच नॉट रिचेबल.
मुंबई महापौर पदावरून राजकीय रणकंदन, वारिस पठाण यांच्या विधानानं वाद
मुंबई महापौर पदावरून राजकीय रणकंदन, वारिस पठाण यांच्या विधानानं वाद.