आपल्या मेंदूचे वजन किती असते? स्वतःला ‘जिनियस’ समजत असाल, तर द्या या प्रश्नांची उत्तरे
स्पर्धा परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतींमध्ये 'जनरल नॉलेज' हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. अनेकदा सोपे वाटणारे पण ट्रीकी प्रश्न विचारले जातात, जे अनुभवी उमेदवारांनाही गोंधळात पाडतात. स्वतःला 'जिनियस' समजत असाल, तर 'या' प्रश्नांची उत्तरे देऊन स्वतःच्या ज्ञानाची परीक्षा घ्या

स्पर्धा परीक्षा असो किंवा नोकरीसाठी मुलाखत, ‘जनरल नॉलेज’ या विषयावर आधारित प्रश्न विचारले जातातच. हे प्रश्न अनेकदा मूलभूत वाटतात, पण त्यांची उत्तरे गुंतागुंतीची आणि फसवी असू शकतात. यामुळे अनेकांना त्यांची उत्तरे देताना अडचणी येतात. त्यामुळे, तुम्ही विद्यार्थी असाल किंवा नोकरीच्या शोधात असाल, तुमच्या व्यक्तिमत्त्वाला धार देण्यासाठी सामान्य ज्ञानावर चांगली पकड असणे आवश्यक आहे. चला, तर मग तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत सामान्य ज्ञानावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे. या प्रश्नांद्वारे तुम्ही तुमच्या ज्ञानाची पातळी तपासू शकता.
महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे:
1. कोणत्या खेळाडूने मुक्केबाजीमध्ये भारतासाठी पहिले ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकले?
उत्तर: ऑलिम्पिक पदक जिंकणारे पहिले भारतीय मुक्केबाज विजेंदर सिंग होते. त्यांनी 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या मिडिलवेट (75 किलो) गटात कांस्यपदक (Bronze Medal) जिंकले होते.
2. भारत आणि पाकिस्तानमधील सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते?
उत्तर: भारत आणि पाकिस्तानमधील सीमारेषा रेडक्लिफ लाईन म्हणून ओळखली जाते. सर सिरिल रॅडक्लिफ यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे, ज्यांनी दोन्ही देशांमधील सीमारेषेचे सीमांकन केले होते.
3. इंद्रधनुष्याच्या मध्यभागी कोणता रंग असतो?
उत्तर: इंद्रधनुष्यातील रंगांचा क्रम जांभळा, इंडिगो (निळा), निळा, हिरवा, पिवळा, नारंगी आणि लाल असा असतो व त्याच्या मध्यभागी हिरवा रंग असतो.
4. हायड्रोजनचा शोध कोणी लावला?
उत्तर: हायड्रोजनचा शोध ब्रिटिश वैज्ञानिक हेन्री कॅव्हेन्डिश यांनी लावला होता. 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात हेन्री यांनी हायड्रोजनला पहिल्यांदा एक वेगळा वायू म्हणून ओळखले.
5. जगात सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या देशाची आहे?
उत्तर: सध्या भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. ‘विश्व लोकसंख्या पुनरावलोकन’ (World Population Review – WPR) च्या ताज्या आकडेवारीनुसार, लोकसंख्येच्या बाबतीत भारत पहिल्या स्थानावर आहे, ज्याची लोकसंख्या 1.46 अब्ज (146 कोटी) पेक्षा जास्त आहे.
6. आशिया खंडातील सर्वात छोटा देश कोणता आहे?
उत्तर: आशिया खंडातील सर्वात छोटा देश मालदीव आहे.
7. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे?
उत्तर: सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध (Mercury) आहे.
8. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर अंदाजे किती आहे?
उत्तर: सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंदाजे अंतर 15 कोटी किलोमीटर (सुमारे 93,000,00 मैल) आहे. सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचायला सुमारे 8 मिनिटे लागतात, कारण प्रकाश 186,000 मैल ( 300,000 किलोमीटर) प्रति सेकंद वेगाने प्रवास करतो.
9. आपल्या शरीराचा कोणता भाग ‘ब्लड बँक’ म्हणून ओळखला जातो?
उत्तर: प्लीहा (Spleen) या अवयवाला आपल्या शरीराची ‘ब्लड बँक’ म्हटले जाते. हे रक्त साठवून ठेवते आणि शरीरात आपत्कालीन परिस्थितीसाठी एक ‘स्टोरेज’ (Storage) म्हणून काम करते. ‘टेस्टबुक’नुसार, प्लीहा (तिल्ली) रक्त शुद्ध करण्यास आणि खराब झालेल्या लाल रक्तपेशी (Red Blood Cells) काढून टाकण्यासही मदत करते.
10. आपल्या मानवी मेंदूचे वजन किती असते?
उत्तर: ‘टेस्टबुक’नुसार, सामान्य मानवी मेंदूचे वजन अंदाजे 3 पाउंड (1,300 – 1,400 ग्रॅम) असते. प्रौढ पुरुषाच्या मेंदूचे सरासरी वजन 1,336 ग्रॅम, तर प्रौढ महिलेच्या मेंदूचे सरासरी वजन 1,198 ग्रॅम असते. याउलट, नवजात बालकाच्या मेंदूचे वजन अंदाजे 350 – 400 ग्रॅम असते.
या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत होती का? अशा प्रकारच्या सामान्य ज्ञानाच्या तयारीने तुम्ही कोणत्याही परीक्षेसाठी किंवा मुलाखतीसाठी अधिक आत्मविश्वासाने तयार होऊ शकता.
