13 नंबर खरंच अशुभ असतो का? अनेक इमारतींमध्ये का नसतो हा मजला, जाणून घ्या रहस्य
13 हा आकडा अनेक संस्कृतींमध्ये अशुभ मानला जातो. त्यामुळे अनेक देशांतील इमारती, हॉटेल्स आणि फ्लॅट सिस्टममध्ये 13 वा मजला किंवा रूम नंबर 13 टाळला जातो. ही एक केवळ अंधश्रद्धा आहे की यामागे काही इतिहास किंवा विज्ञान आहे? चला जाणून घेऊया.

13 हा आकडा म्हणजे अजूनही अनेक लोकांसाठी भीतीचं कारण आहे. आपणही लक्ष दिलं असेल की बऱ्याच हॉटेल्स, अपार्टमेंट्स किंवा मोठ्या इमारतींमध्ये 13 नंबरचा मजला किंवा 13 नंबरचं खोली दिसतच नाही. अनेक वेळा 12 नंतर थेट १४वा मजला येतो. असं का होतं, हे आजही अनेकांच्या मनात एक कोडं आहे.
म्हणतात ना, विज्ञान कितीही पुढं गेलं तरी काही गोष्टी मनाच्या शांततेसाठी आपण लॉजिकपेक्षा श्रद्धेला महत्त्व देतो. 13 नंबरबद्दलची भीती हे त्याचंच उदाहरण आहे.
13 आकड्याची भीती – Triskaidekaphobia
संपूर्ण जगभरात 13 या आकड्याबद्दल एक वेगळीच भीती पसरलेली आहे. या मानसिक स्थितीला Triskaidekaphobia असं म्हटलं जातं. या आजारात लोक 13 आकड्याला अशुभ समजतात. काही देशांमध्ये तर 13 तारखेला काहीही नवीन काम, प्रवास किंवा मोठं निर्णय घेतले जात नाहीत.
या भीतीमुळे काही लोकांना 13 नंबर पाहून धडधड वाढते, छातीत दुखू लागतं आणि काहींची श्वास घेण्यात अडचण होते. विशेषतः हॉटेल्स किंवा अपार्टमेंट्समध्ये 13 नंबरच्या खोलीत राहायला नकार दिला जातो. लोकांचं म्हणणं असतं की 13 नंबरच्या ठिकाणी काही ना काही विपरित घडतंच.
ईसाई धर्माशी असलेला संबंध
13आकड्याबद्दलच्या अंधश्रद्धेचं मूळ ख्रिश्चन धर्मातदेखील सापडतं. असं मानलं जातं की Last Supper ईसा मसीहांचा शेवटचा जेवणाचा कार्यक्रम यामध्ये 13जण उपस्थित होते. आणि त्याच वेळी त्यांना फसवून पुढे फाशी देण्यात आली. त्यामुळे 13वा व्यक्ती अशुभ मानला गेला. या घटनेचा प्रभाव आजही 13 आकड्याबाबत लोकांच्या मनात आहे.
रिअल इस्टेट आणि हॉटेल इंडस्ट्रीवर परिणाम
या अंधश्रद्धेचा सर्वात मोठा परिणाम रिअल इस्टेट आणि हॉटेल व्यवसायावर झाला आहे. अनेक बिल्डिंग्समध्ये 12 नंतर थेट 14वा मजला लिहिलेला दिसतो. काही ठिकाणी ‘13’ च्या जागी ‘१२A’ किंवा ‘14A’ असं लिहिलेलं असतं. यामागे उद्देश एकच लोकांना मानसिक शांतता मिळावी. हॉटेल मालकही 13 नंबरचं खोली ठेवायला कचरतात, कारण ग्राहक तिथं थांबायला नकार देतात. त्यामुळे व्यवसायात नुकसान होऊ शकतं.
भारतातही प्रभाव
या अंधश्रद्धेचा प्रभाव आता भारतातही स्पष्ट दिसून येतो. अनेक जण 13 तारखेला नवीन घरात शिफ्ट होणं, लग्न करणं किंवा व्यवसाय सुरू करणं टाळतात. अनेकांनी सांगितलं आहे की 13 नंबरच्या खोलीत थांबल्यावर त्यांच्या अडचणी वाढल्या.
मग विज्ञान काय सांगतं?
विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर 13 हा केवळ एक आकडा आहे. याचा कुठल्याही चांगल्या किंवा वाईट घटनांशी काहीच संबंध नाही. पण मनाच्या शांतीसाठी लोक अजूनही अंधश्रद्धा पाळतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
