Tech Quiz : यूट्यूब लाँच कधी झालं? बऱ्याच लोकांना माहितच नाही!
तुम्ही रोज यूट्यूबवर व्हिडिओ बघता, गाणी ऐकता, कंटेंट शेअर करता... पण कधी विचार केला आहे का की यूट्यूबची सुरुवात नेमकी कधी झाली? नाही तर चला जाणून घेऊया...

आज YouTube केवळ एक अॅप किंवा वेबसाइट नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. एंटरटेनमेंट, शिक्षण, कमाई आणि माहिती या सर्व गरजांसाठी YouTube हे पहिले माध्यम बनले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की हे जगप्रसिद्ध व्हिडिओ प्लॅटफॉर्म नक्की कधी सुरू झालं आणि कोणी ते सुरू केलं? चला, या टेक क्विझच्या निमित्ताने जाणून घेऊया YouTube चा रंजक इतिहास.
YouTube नेमकं सुरू कधी झालं?
उत्तर आहे – फेब्रुवारी 2005
YouTube ची सुरुवात PayPal मध्ये काम करणाऱ्या तीन मित्रांनी चॅड हर्ली, स्टीव्ह चेन आणि जवेद करीम यांनी केली होती. त्यांचा उद्देश असा एक प्लॅटफॉर्म तयार करण्याचा होता जिथे कुणीही स्वतःचं व्हिडिओ सहज अपलोड करू शकेल आणि ते जगभरातील इतर लोकांसोबत शेअर करू शकेल.
व्हिडिओ शेअर करणं होतं कठीण
YouTube सुरू होण्याआधी इंटरनेटवर व्हिडिओ शेअर करणं खूप कठीण होतं. मोठ्या व्हिडिओ फाइल्स मेल करणं किंवा इतर क्लिष्ट वेबसाइट्स वापरणं हे अनेकांसाठी अवघड काम होतं. हीच समस्या लक्षात घेऊन या तिघांनी मिळून फेब्रुवारी 2005 मध्ये YouTube चं बीटा वर्जन (टेस्टिंग फेज) मध्ये सुरू केलं. यालाच ‘सॉफ्ट लॉन्च’ म्हणतात. सुरुवातीला फारच कमी लोकांना याचा पत्ता होता.
पहिला व्हिडिओ
YouTube वर पहिलं व्हिडिओ 23 एप्रिल 2005 रोजी Jawed Karim यांनी अपलोड केलं होतं. याचं नाव आहे “Me at the zoo”. हे व्हिडिओ अजूनही YouTube वर उपलब्ध आहे आणि हा प्लॅटफॉर्मच्या इतिहासात मैलाचा दगड मानला जातो.
लोकप्रियतेचा प्रवास सुरू
2005 च्या उत्तरार्धात YouTube ला चांगली प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली. मग फेब्रुवारी 2006 मध्ये त्याचा मोठा ‘पब्लिक डेब्यू’ झाला. मीडिया कव्हरेज आणि मार्केटिंगच्या जोरावर YouTube जगभरात पोहोचला. म्हणून अनेक जण 2006 ला YouTube चं खऱ्या अर्थानं लॉन्च मानतात.
Google ची मोठा डील
YouTube ची लोकप्रियता इतकी वाढली की, नोव्हेंबर 2006 मध्ये Google ने YouTube ला तब्बल 1.65 अब्ज डॉलर (बिलियन डॉलर्स) मध्ये स्टॉक स्वरूपात खरेदी केलं. त्यानंतर YouTube अधिकच मजबूत आणि यशस्वी झालं.
आजचा YouTube
आज YouTube हा फक्त व्हिडिओ पाहण्याचा नाही तर कमाईचा, शिकण्याचा आणि प्रसिद्ध होण्याचा एक प्रचंड मोठा माध्यम बनलं आहे. लाखो लोक यावर कंटेंट बनवतात, लाखो रुपये कमावतात, आणि कोट्यवधी लोक दररोज काहीतरी शिकतात.
थोडक्यात सांगायचं झालं, तर फेब्रुवारी 2005 मध्ये YouTube चं बीटा वर्जन सुरू झालं, त्यानंतर एप्रिल 2005 मध्ये Me at the zoo हे पहिलं व्हिडिओ अपलोड करण्यात आलं. फेब्रुवारी 2006 मध्ये YouTube चा पब्लिक लॉन्च झाला आणि त्याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. अखेर, नोव्हेंबर 2006 मध्ये Google ने YouTube ला 1.65 अब्ज डॉलरमध्ये खरेदी करून त्याच्या यशाला आणखी गती दिली.
