हैदराबादहून आलेल्या ट्रकचा थरारक पाठलाग, अमरावतीत पोलिसांनी 300 किलो गांजा पकडला

याप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. या कारवाई 3 क्विंटल गांजासह जवळपास 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हैदराबादहून आलेल्या ट्रकचा थरारक पाठलाग, अमरावतीत पोलिसांनी 300 किलो गांजा पकडला
Follow us
| Updated on: Jun 07, 2020 | 6:11 PM

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलिसांनी 3 क्विंटलपेक्षा (Amravati Police Seized Weed) जास्त गांजा जप्त केला. वलगाव पोलीस ठाण्यासमोर नाका बंदी दरम्यान एका मालवाहू ट्रकमधून हा गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. या कारवाई 33 लाखांच्या गांजासह जवळपास 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला (Amravati Police Seized Weed) आहे.

हैदराबादच्या निजामाबाद येथून एक ट्रक अमरावती शहरात गांजाची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. हा ट्रक नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जात असल्याची माहिती होती. त्यामुळे नागपुरी पोलिसांनी ट्रकचा पाठलाग केला. दरम्यान, ट्रक पुढे जात असल्याचं पाहून नागपुरी गेट पोलिसांनी वलगाव पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

वलगाव पोलिसांनी सापळा रचत या ट्रकला थांबवलं. या ट्रकमधून तब्बल 3 क्विंटल गांजाची तस्करी केली जात असल्याचं समोर आलं. वलगाव पोलिसांनी जवळपास 33 लाखांचा 3 क्विंटल गांजा आणि 12 लाखांचा ट्रक असा एकूण 45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला (Amravati Police Seized Weed).

याप्रकरणी मोहम्मद सिद्दीकी मोहम्मद फारक (वय 25), सलीम मुल्ला मुजफ्फर मुल्ला (वय 35), शेख सोयब शेख हसन (वय 25), अनुज नवजीरे या चार जणांना अटक केली. हे सर्वजण अमरावतीचे राहणारे आहेत. या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे.

सदर ट्रक मधील गांजा हा परतवाडा येथे घेऊन जात असल्याची माहिती आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी कशी होते, हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. सदर कारवाई वलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या निरिक्षणाखालील पथकाने केली (Amravati Police Seized Weed).

संबंधित बातम्या :

नवी मुंबईत भररस्त्यात बिल्डरला गोळ्या घातल्या, डोक्यात गोळी मारल्याने जागीच मृत्यू

जालन्यात कोरोना संशयिताचा अंत्यविधी, मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह, अंत्यविधीला उपस्थित 100 जणांवर गुन्हा दाखल

पोलीस ठाण्यातच धारदार शस्त्राने हत्या, साताऱ्यातील थरारक घटना

नागपुरात तुरुंगातून सुटलेल्या व्यक्तीची हत्या, तीन संशयित ताब्यात

Non Stop LIVE Update
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.