Video : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी

| Updated on: Apr 16, 2022 | 5:56 PM

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यासह बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vase) आणि अन्य दोघांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने शनिवारी न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली. अनिल देशमुख यांची सीबीआय कोठडी वाढवून देण्यासाठी सीबीआयने विनंती केली होती. ती विनंती अमान्य करीत न्यायालयाने देशमुखांसह वाझे व इतर दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. […]

Follow us on

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यासह बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vase) आणि अन्य दोघांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने शनिवारी न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली. अनिल देशमुख यांची सीबीआय कोठडी वाढवून देण्यासाठी सीबीआयने विनंती केली होती. ती विनंती अमान्य करीत न्यायालयाने देशमुखांसह वाझे व इतर दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यामुळे हा निर्णय सीबीआयसाठी धक्का देणारा असून अनिल देशमुख यांच्यासाठी काही अंशी दिलासासादायक मानला जात आहे. अनिल देशमुख हे कथित 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात आरोपी आहेत.