गुपित उलगडलं… म्हणून मुंबई-पुण्यात 'दादा, मी प्रेग्नंट आहे'चे पोस्टर लावले होते!

मुंबई : मुंबई-पुण्यात झळकलेल्या ‘दादा, मी प्रेग्नंट आहे’ पोस्टरचं गुपित उलगडलं आहे. हे पोस्टर लावण्यामागचं कारण समोर आलं आहे. हे पोस्टर का लावले असावेत, यामागे काय कारण असावे, याचे अनेक अंदाज लढवले जात होते. कुणी म्हणत होतं, मस्करीत हे पोस्टर लावले असावे, तर कुणी म्हणत होते, मुंबई-पुणे-मुंबई सिनेमच्या प्रसिद्धीसाठी ही क्लृप्ती वापरण्यात आली असावी. पण […]

गुपित उलगडलं... म्हणून मुंबई-पुण्यात 'दादा, मी प्रेग्नंट आहे'चे पोस्टर लावले होते!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

मुंबई : मुंबई-पुण्यात झळकलेल्या ‘दादा, मी प्रेग्नंट आहे’ पोस्टरचं गुपित उलगडलं आहे. हे पोस्टर लावण्यामागचं कारण समोर आलं आहे. हे पोस्टर का लावले असावेत, यामागे काय कारण असावे, याचे अनेक अंदाज लढवले जात होते. कुणी म्हणत होतं, मस्करीत हे पोस्टर लावले असावे, तर कुणी म्हणत होते, मुंबई-पुणे-मुंबई सिनेमच्या प्रसिद्धीसाठी ही क्लृप्ती वापरण्यात आली असावी. पण अखेर या पोस्टरमागचे कारण समोर आले आहे. मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिने सोशल मीडियावर ‘एक गुड न्यूज’ आहे अशी पोस्ट शेअर केली होती. दादरच्या प्रभादेवी परिसरातही ‘दादा, मी प्रेग्नन्ट आहे.’ असे होर्डिंगही लावण्यात आले होते. अनेकांनी याबाबत तर्कवितर्क काढले आणि अखेर हे गुपित उलगडले. हे पोस्टर उमेश कामतच्या आगामी नाटकाची प्रसिद्धी आहे. नाट्यरसिकांसाठी प्रिया बापट आणि सोनल प्रोडक्शन्स एक नवंकोरं नाटक घेऊन येत आहे. ‘दादा,एक गुड न्यूज आहे.’ असे या नाटकाचे नाव आहे. या नाटकाचे  पोस्टर सोशल नेटवर्किंग साईटवर रिलीज करण्यात आले. बहीण भावाच्या प्रेमळ आणि विश्वासू नात्याची गोष्ट आपल्याला ह्या नाटकाद्वारे पाहायला मिळेल. उमेश कामत आणि ऋता दुर्गुळे ही भावा बहिणीची जोडी आपल्याला या नाटकात दिसणार आहे. उमेश या नाटकामध्ये एक साधं नॉर्मल आयुष्य जगणारा, खंबीर, कर्तव्याची जाण असलेला आणि बहिणीवर विशेष प्रेम असणाऱ्या भावाची भूमिका निभावत असून, ऋता ही कॉलेजला जाणारी, आयुष्य एन्जॉय करणारी आणि भावावर जीवापाड प्रेम करणारी अशी बहीण साकारत आहे. ऋताचे हे रंगभूमीवरील पहिलेच व्यासायिक नाटक आहे.

सोनल प्रोडक्शन निर्मित आणि  कल्याणी पाठारे लिखित ह्या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केली असून, नंदू कदम ह्या नाटकाचे निर्माते आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीताची धुरा ओंकार पाटील यांनी सांभाळली असून, आरती मोरे, ऋषी मनोहर आणि जयंत घाटे ह्या कलाकारांचा देखील समावेश नाटकात असणार आहे. संबंधित बातम्या : ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ पोस्टरनंतर आता ‘शी इज मिसिंग’ ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ पोस्टरचा अर्थ समजला?

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.