Bihar Election Result 2020 | गुप्तेश्वर पांडेंचा डोळा असलेल्या बक्सरमधून तिकीट मिळालेल्या कॉन्स्टेबलची दमछाक

भाजपकडून परशुराम चौबेंना बक्सर विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं

Bihar Election Result 2020 | गुप्तेश्वर पांडेंचा डोळा असलेल्या बक्सरमधून तिकीट मिळालेल्या कॉन्स्टेबलची दमछाक
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 4:20 PM

Bihar Election Result 2020 LIVE पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल (Bihar Vidhansabha Election Result) अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे (Gupteshwar Pandey) यांचा डोळा असलेल्या बक्सर मतदारसंघातून (Buxar Vidhansabha) तिकीट मिळालेल्या भाजप उमेदवाराची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. (Bihar Election Result 2020 Buxar Vidhansabha Result where Gupteshwar Pandey was eyeing LIVE Updates)

पोलीस कॉन्स्टेबल परशुराम चौबे (Parshuram Chaubey) यांनी राजकीय आखाड्यात उतरण्यासाठी सेवानिवृत्ती घेतली होती. भाजपच्या गोटात सामील झालेल्या चौबेंना बक्सर विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं. खरं तर बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा बक्सरवर डोळा होता. बक्सरमधून निवडणूक लढण्यासाठीच त्यांनी सेवानिवृत्ती घेत घाईघाईने नितीशकुमार यांच्या राजदमध्ये प्रवेशही केला. परंतु जागावाटपात बक्सर मतदारसंघ जेडीयूऐवजी एनडीएतील भाजपच्या वाट्याला गेला. त्यामुळे माजी पोलीस महासंचालकांऐवजी सेवानिवृत्त पोलीस कॉन्स्टेबलला तिकीट मिळालं.

सुरुवातीच्या कलांनुसार परशुराम चौबे यांनी बक्सरमधून आघाडी घेतली असली, तरी काँग्रेस उमेदवार संजय कुमार तिवारी यांनी चौबेंना टफ फाईट दिली. दोन्ही उमेदवारांमध्ये जेमतेम एक हजार मतांचा फरक आहे. तर तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे निर्मलकुमार सिंहसुद्धा मागे नाहीत.

पांडेंचं वेट अँड वॉच

‘शुभचिंतकांच्या फोननी मी हैराण झालोय, त्यांची चिंता मी समजू शकतो. मी सेवामुक्त झाल्याने निवडणूक लढवेन, अशी अनेकांची अपेक्षा होती. परंतु मी यावेळी निवडणूक लढवत नाही. माझं आयुष्य संघर्षमय होतं. मी जीवनभर जनतेची सेवा करत राहीन. कृपया संयम बाळगा आणि मला फोन करु नका” अशा भावना पांडे यांनी तिकीट न मिळाल्यानंतर सोशल मीडियावरुन व्यक्त केल्या होत्या. (Bihar Election Result 2020 Buxar Vidhansabha Result where Gupteshwar Pandey was eyeing LIVE Updates)

गुप्तेश्वर पांडे फेब्रुवारी 2021 मध्ये सेवानिवृत्त होणार होते, मात्र पाच महिने आधीच त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली. गुप्तेश्वर पांडे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. बिहारचे पोलिस महासंचालक म्हणून व्हीआरसी घेतल्यावर पांडे राजकारणात प्रवेश करण्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या, मात्र ते वारंवार फेटाळून लावत होते. अखेर या अटकळी खऱ्या ठरवत त्यांनी जेडीयूतून राजकारणात पाऊल ठेवलंच.

संबंधित बातम्या

Gupteshwar Pandey | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU मध्ये प्रवेश

ओवेसी फॅक्टरने समीकरणच बदलले, 11 जागांवर NDA ची घोडदौड

शिवसेनेने महाराष्ट्रात हिसका दाखवलाय, त्यामुळे बिहारमध्ये भाजप शब्द फिरवणार नाही: राऊत

(Bihar Election Result 2020 Buxar Vidhansabha Result where Gupteshwar Pandey was eyeing LIVE Updates)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.