कबीर सिंगनंतर शाहीद कपूरचा भाव वधारला, पुढच्या सिनेमासाठी 40 कोटींची मागणी

Namrata Patil

|

Updated on: Jul 23, 2019 | 8:03 PM

कबीर सिंग चित्रपट हीट झाल्यानंतर शाहीद कपूरला अजून एका तेलगू चित्रपटाच्या रिमेकची ऑफर आली आहे. या चित्रपटासाठी शाहीदने आपल्या मानधनात 4 पटीने वाढ केली आहे.

कबीर सिंगनंतर शाहीद कपूरचा भाव वधारला, पुढच्या सिनेमासाठी 40 कोटींची मागणी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने 31 दिवसात 271 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटामुळे सिनेसृष्टीतून बाहेर गेलेला  शाहीद चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. अर्जुन रेड्डी या तेलगू चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘कबीर सिंग’ने शाहीदच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. हा चित्रपट हीट झाल्यानंतर त्याला अजून एका तेलगू चित्रपटाच्या रिमेकची ऑफर आली आहे. ‘जर्सी’ असे या तेलगू चित्रपटाचे नाव आहे. पण या चित्रपटासाठी शाहीदने चक्क 40 कोटींची मागणी केली आहे.

विविध हिंदी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, शाहीदला तेलुगू चित्रपट जर्सीच्या हिंदी रिमेकसाठी विचारणा केली आहे. या चित्रपटाचे मानधन म्हणून त्याने चक्क 40 कोटींची मागणी केली आहे. यामुळे कबीर सिंग चित्रपटानंतर शाहीदचा भाव चांगलाच वधारलेला दिसत आहे. शाहीद आतापर्यंत  एखाद्या चित्रपटासाठी 10 ते 12 कोटी रुपये मानधन घेत होता. मात्र आता त्याने आपल्या मानधनात चार पटीने वाढ केल्याचे बोलले जात आहे.

‘जर्सी’ या चित्रपटात एका क्रिकेटपटूचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटातील क्रिकेटपटू संघातून काही कारणाने बाहेर पडतो. त्यानंतर पुन्हा त्या क्रिकेट संघात जाण्यासाठी कशाप्रकारे मेहनत करतो असे या चित्रपटाचे कथानक आहे.

View this post on Instagram

Thank you for the overwhelming love. #kabirsingh

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

‘जर्सी’ हा तेलगू चित्रपट गौतम तिन्नानुरी या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपट तेलगू भाषेत फार सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात तेलगू अभिनेता नानी ने क्रिकेटपटूची भूमिका साकारली होती. या चित्रपट यंदाच्या वर्षी 2019 ला प्रदर्शित झाला होता.

जर दिग्दर्शकांनी शाहीद कपूरच्या 40 कोटींची मागणी मान्य केली तर मग शाहीदच्या चाहत्यांना तो पुन्हा एकदा क्रिकेटपटूच्या भूमिकेत पाहायला मिळेल. याआधीही 2009 मध्ये रिलीज झालेल्या हडिप्पा या चित्रपटात शाहीदने क्रिकेटपटूची भूमिका निभावली होती.

दरम्यान शाहिदने साकारलेला कबीर सिंग हा तेलगू ब्लॉकबस्टर अर्जून रेड्डी यांचा हिंदी रीमेक आहे. प्रेमात वेडा झालेल्या मुलाची भूमिका शाहीद कपूरने साकारली आहे. चित्रपटात शाहीद कपूरच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले आहे. या चित्रपटात शाहीदने अभिनेत्र कियारा अडवाणी सोबत स्क्रीन शेअर केली आहे.

संबंधित बातम्या : 

तुझा अस्थमा बरा झाला का? सिगारेट ओढणाऱ्या प्रियांकाला नेटकऱ्यांचा प्रश्न

अभिनेत्री मंदना करीमीचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI