Sapna Pabbi | सपना पब्बीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

अभिनेत्री लवेना लोधच्या आरोपांनंतर ब्रिटीश अभिनेत्री आणि मॉडेल सपना पब्बी अडचणीत आली आहे. लवेनाने आपला पती सुमित सभरवाल याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Sapna Pabbi | सपना पब्बीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
अभिनेत्री सपना पब्बी ही ब्रिटीश नागरिक असून अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी ती भारतात आली होती.

मुंबई : अभिनेत्री लवेना लोधच्या आरोपांनंतर ब्रिटीश अभिनेत्री आणि मॉडेल सपना पब्बी अडचणीत आली आहे. लवेनाने आपला पती सुमित सभरवाल याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चित्रपटसृष्टीमध्ये सपना पब्बी सारख्या अभिनेत्रींना ड्रग्ज पुरवण्याचे काम सुमित करत असल्याचा दावा तिने केला आहे. सपना पब्बी ही एक ब्रिटीश अभिनेत्री आणि मॉडेल आहे. आणि ती गेली काही वर्षे मनोरंजन क्षेत्रात आपला ठसा उमटविण्याच्या प्रयत्न करते आहे. (bollywood Drug Connection Sapna Pabbi NCB )
कोण आहे सपना पब्बी?
अभिनेत्री सपना पब्बी ही ब्रिटीश नागरिक असून, अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी ती भारतात आली होती. तिचे संपूर्ण बालपण देखील लंडनमध्येच गेले आहे. टीव्ही मालिकांमधून करिअरची सुरुवात करणार्‍या सपनाने आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये काम केले आहे. ‘घर आजा परदेसी’ ‘कसौटी जिंदगी की’मध्ये सपना पब्बी आधी निवेदिताची भूमिका करत होती, यानंतर सपनाने काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ’24’ या मालिकेमधून पुनरागमन केले होते. या मालिकेत तिने अनिल कपूरच्या मुलीची भूमिका साकारली होती. सपना फक्त हिंदी चित्रपटांपुरतीच मर्यादित न राहता तिने वेगवेगळ्या भाषातील चित्रपटामध्ये काम केले. द ट्रीप, ब्रिद २००९ मध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम फॉर मोअर शॉट्स प्लीज आणि इनसाईड एज 2 या दोन लोकप्रिय वेबसाइट्समध्ये तिने उत्तम अभिनय केला.
सपनाने नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या सुशांत सिंग राजपूतसोबत ड्राईव्ह या चित्रपटातही काम केले आहे. यापूर्वी सुशांतसोबत काम केलेल्या अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरची एनसीबीने चौकशीही केली आहे. आणि एनसीबीने सपना हिला ही तिच्या मुंबईच्या घरी समन्सही पाठवला आहे. दुसरीकडे, सपनाने आपल्या ट्विटवर म्हटले आहे की, ती सध्या आपल्या कुटुंबासमवेत लंडनमध्ये आहे.
हर्षवर्धन कपूरशी अफेअरमुळे चर्चेत
सपना पब्बी काही महिन्यांपूर्वी अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरला डेट करत होती. या दोघांची पहिली भेट ‘24’च्या सेटवर झाली होती. सपना आणि हर्षवर्धनमध्ये पहिल्याच भेटीत छान मैत्री झाली होती. दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल मौन राखले होते. मात्र, अनिल कपूरला हे नाते मान्य नसल्याने या दोघांच्या मैत्रीत फूट पडल्याचे म्हटले जाते.

संबंधित बातम्या : 

लग्नास नकार दिल्याचा राग, मुंबईत चित्रपट अभिनेत्रीवर चाकूहल्ला

Ananya Birla | अनन्या बिर्लाचे अमेरिकन रेस्टॉरंटवर गंभीर आरोप

(bollywood Drug Connection Sapna Pabbi NCB )

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI