राज्यात पुढील पाच दिवसात पावसाची शक्यता

राज्यात पुढील पाच दिवस कमी अधिक प्रमाणात पाऊस पडणार आहे. कोकण, गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे.

राज्यात पुढील पाच दिवसात पावसाची शक्यता

पुणे : राज्यात पुढील पाच दिवस कमी अधिक प्रमाणात (Chance Of Rain In Maharashtra) पाऊस पडणार आहे. कोकण, गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने (Chance Of Rain In Maharashtra) वर्तविली आहे.

13 आणि 14 एप्रिलला गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर 14 तारखेला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे (Chance Of Rain In Maharashtra).

तर 15 एप्रिलला मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर 16 आणि 17 तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

दोन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तर पुण्यात 13 तारखेला हलक्या स्वरुपात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे (Chance Of Rain In Maharashtra).

संबंधित बातम्या :

Lockdown : लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम, गंगेचं पाणी पिण्यायोग्य स्वच्छ

Corona : नवी मुंबईत एकाच कुटुंबातील 6 जणांना कोरोना, 11 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 50 वर

पुण्यातील भवानी पेठ कोरोनाचे ‘डेथ सेंटर’, 11 रहिवासी दगावले, रुग्णसंख्या 69 वर

Corona : वसईत अणखी एक कोरोनाबळी, दोघांना कोरोनाची लागण, रुग्णांची संख्या 40 वर

Published On - 9:16 pm, Mon, 13 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI