AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना संसर्गाने तमाशाही अडचणीत, सुपाऱ्या रद्द झाल्यानं कोट्यावधींचा फटका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा-जत्रा, सण, उत्सव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तमाशाच्या सुपारीवर मोठा परिणाम झाला आहे (Corona Effect on Tamasha).

कोरोना संसर्गाने तमाशाही अडचणीत, सुपाऱ्या रद्द झाल्यानं कोट्यावधींचा फटका
| Updated on: Mar 17, 2020 | 12:30 PM
Share

पुणे : संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे (Corona Effect on Tamasha). त्यातच राज्य सरकारने राज्यात कोरोनाच्या पार्शवभूमीवर यात्रा-जत्रा, सण, उत्सव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तमाशाच्या सुपारीवर मोठा परिणाम झाला आहे. फडमालक यामुळे मोठे धास्तावले आहेत. ऐन हंगाम सुरु होण्याच्या काळात तमाशा पंढरीत तमाशा ठरवण्यासाठी येणारे गावपुढारी फिरकेनासे झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी तमाशा पंढरी असलेल्या नारायणगावमध्येही याचे प्रतिकुल पडसाद उमटले आहेत.

ग्रामीण भागात तमाशाचे फड लोकप्रिय आहेत. कलाकारांसोबत तमाशा पाहायला आलेले प्रेक्षकही बेभान होतात. तमाशातील गाणी आणि विनोद यांना रसिक प्रेक्षक जोरदार दाद देत असतात. मात्र, यंदा फंड रंगणं, तर सोडाच पण तमाशाला सुपारीच मिळत नसल्यानं तमाशा मालक चांगलेच धास्तावले आहेत. प्रसिद्ध तमाशा कलाकार आणि तमाशा फडमालक मंगला बनसोडे यांनी या पूर्ण परिस्थितीविषयी माहिती दिली.

यात्रा हंगाम सुरु होण्याच्या काळात तमाशा पंढरी असलेल्या नारायण गावात तमाशाची बारी ठरवण्यासाठी येणारे गाव पुढारी फिरकेनासे झालेत. परिणामी फड मालकांनी थाटलेल्या राहुट्या ओस पडल्यात. पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरात यात्रा उत्सव सुरु होतात. त्याआधी दरवर्षी साधारणपणे 1500 सुपारी बुक होतात. त्यातून सुमारे 10 ते 10 कोटींची उलाढाल होत असते. मात्र यंदा कोरोनाच्या सावटामुळे तमाशाचा तमाशा झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी म्हणून जत्रा-यात्रा उत्सव बंद करण्याचे आदेश दिल्याने आता फड मालक हातावर हात देऊन बसले आहेत.

मागील वर्षी याच वेळेपर्यंत 113 तमाशा फडाचे बुकिंग झाले होते. यामधून तब्बल 16 कोटी 94 हजार 634 रुपये इतकी रक्कम जमा झाली होती. यावर्षी आजच्या तारखेला 135 तमाशा फडाचे बुकिंग झाले होते. त्यापैकी तब्बल 75 बुकिंग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द झाले आहेत. या 75 बुकिंगमध्ये अंदाजे एक ते दीड कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. आणखी काही बुकिंगही रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजेच तमाशा व्यवसायाला जवळपास 80 ते 85 टक्के फटका बसण्याची शक्यता आहे.

एका तमाशा फडात 150 ते 200 कलाकार काम करत असतात. यातुनच संसाराचा गाडा हाकला जातो. मात्र गेल्या 4 वर्षांपासून तमाशाला ग्रहण लागलं आहे. दुष्काळ, नोटबंदी, निवडणुका आणि आता कोरोना यापुढे हे तमाशा कलावंत हतबल झाले आहेत. जगायचं कसं असा थेट सवाल यानिमित्ताने हे कलाकार उपस्थित करत आहेत. प्रसिद्ध तमाशा कलाकार आणि तमाशा फडमालक रघुवीर खेडकर यांनीही तमाशा कलाकारांचं दुःख मांडलं.

मागील 80 वर्षांपासूनची तमाशा कलावंतांची ही परंपरा आता संकटात सापडली आहे. आता कोरोनामुळे हे सगळंच बंद झालंय. त्यामुळे मायबाप सरकारनं या तमाशा कलावंताच्या कलेची कदर करुन मदतीचा हात पुढे करण्याची मागणी कलाकारांकडून केली जात आहे.

संबंधित बातम्या:

Maharashtra corona death | महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी, बाधिताच्या संपर्कात 9 जण

Maharashtra Corona: महाराष्ट्राला किंचित दिलासा, 15 तासात एकही नवा रुग्ण नाही : राजेश टोपे

पुण्यात तीन दिवस व्यापार बंद, मात्र किराणा, दूध, औषधे, भाजीपाला सुरु राहणार

Corona Updates: शिर्डीचे साईबाबा मंदिर आजपासून बंद

7000 मृत्यू, अमेरिकेत संचारबंदी, फ्रान्स लॉकडाऊन, कोरोनासमोर महाशक्तिशाली देशही हतबल

CoronaVirus: अमेरिकेत कोरोनावरील पहिल्या लसीची चाचणी, लवकरच बाजारात उपलब्ध होणार

Corona Effect on Tamasha

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.