Video: जीवनयात्रा संपवायला निघालेली तरुणी; सीआयएसएफ जवानांमुळे वाचला जीव

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांकडून तात्काळ कारवाई झाल्यामुळेच आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव वाचला आहे. या घटनेच्या व्हिडिओमध्ये जवान तिला खाली येण्याची विनवणी करत आहेत, मात्र ती ऐकत नाही. आणि अचानक अधिकाऱ्यांबरोबर बोलता बोलता ती इमारतीवरुन खाली उडी मारली आहे. या घटनेची सगळी दृश्यं कॅमेऱ्यामध्ये कैद्य केली गेली आहेत.

Video: जीवनयात्रा संपवायला निघालेली तरुणी; सीआयएसएफ जवानांमुळे वाचला जीव
अक्षरधाम मेट्रो स्टेशनवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलीचा मृत्यू
Image Credit source: facebbok
महादेव कांबळे

|

Apr 15, 2022 | 12:07 AM

नवी दिल्ली: अक्षरधाम मेट्रो स्थानकावर ( Akshardham metro station) गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांमुळे आत्महत्या करणाऱ्या मुलीचा (Girl) जीव वाचवण्यात सीआयएसएफ जवानांना यश आले. गुरुवारी सकाळी एका मुलीने अक्षरधाम स्थानकावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तिच्या आत्महत्या (Suicide) करण्याचे कारण अजून समजले नसले तरी स्थानिक पोलीस चौकशी करत आहेत. गुरुवारी सकाळी ही घटना घडली आहे. अक्षरधाम मेट्रो स्थानकावरुन उडी मारुन आत्महत्या करणाऱ्या या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाला आहे.

दिल्लीतील अक्षरधाम मेट्रो स्टेशनवर चढून उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या मुलीला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांकडून थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे त्या मुलीचा जीव वाचला आहे.

सीआयएसएफ जवानांचे धैर्य

ज्यावेळी ती स्टेशनच्या इमारतीवर चढून उडी मारण्याच्या तयारीत होती तेव्हा तिला सीआयएसएफचे जवान तिला समजून सांगत होते. मात्र ती कोणाचेही ऐकण्याची मानसिकतेते नव्हती. तरीही पोलिसांनी तिला बोलण्यात गुंतवून काही पोलिसांनी इमारतीच्या खाली जाऊन चादर धरली होती. सुरक्षा दलाच्या जवानांबरोबर बोलत असतानाच अचानक तिने उडी मारली.

मुलीला अधिकाऱ्यांची विनवणी

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांकडून तात्काळ कारवाई झाल्यामुळेच आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव वाचलवण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे. या घटनेच्या व्हिडिओमध्ये जवान तिला खाली उतरण्याची विनवणी करत आहेत, मात्र ती ऐकत नाही. आणि अचानक अधिकाऱ्यांबरोबर बोलता बोलता ती इमारतीवरुन खाली उडी मारली आहे. या घटनेची सगळी दृश्यं कॅमेऱ्यामध्ये कैद्य केली गेली आहेत.

जवानांची युक्ती

मात्र इमारतीखाली सीआयएसएफच्या जवानांनी चादर पकडल्यामुळे तिला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र तिच्या पायाला दुखापत झाली असल्याने तिला रुग्णालयात दाखल केले गेले. डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.

स्थानीक पोलिसांकडून चौकशी

सीआयएसएफच्या जवानांकडून इमारतीवरुन उडी मारणाऱ्या मुलीचा जीव वाचवून तिच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली आहे. प्रकृती स्थिर असल्याने आता तिने आत्महत्या करण्याचा का प्रयत्न करावा लागला याचा तपास स्थानीक पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या

केंद्र सरकारने बांधले 1 लाख 41 हजार किमीपेक्षा जास्त राष्ट्रीय महामार्ग.. 2025 पर्यंत बांधायचे आहेत, दोन लाख कीलोमीटर पर्यंतचे रस्ते

Gondia : यादीत नाव येऊनही कर्ज माफी न झाल्याने गोंदियातील शेतकरी चढला मोबाईल टॉवरवर

Video : उल्हासनगरमध्ये मोबाईल चोरीसाठी हत्या करणाऱ्या दोघांना बेड्या, तांत्रिक तपासाच्या आधारे कारवाई

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें