AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CoronaVirus: अमेरिकेत कोरोनावरील पहिल्या लसीची चाचणी, लवकरच बाजारात उपलब्ध होणार

कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात मृतांची संख्या वाढत आहे. याच दरम्यान अमेरिकेत संशोधकांनी कोरोनावरील पहिल्या लसीची चाचणी केली आहे (First Vaccine on Corona Virus).

CoronaVirus: अमेरिकेत कोरोनावरील पहिल्या लसीची चाचणी, लवकरच बाजारात उपलब्ध होणार
| Updated on: Mar 17, 2020 | 12:29 PM
Share

वॉशिंग्टन : कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात मृतांची संख्या वाढत आहे. याच दरम्यान अमेरिकेत संशोधकांनी कोरोनावरील पहिल्या लसीची चाचणी केली आहे (First Vaccine on Corona Virus). यावेळी संशोधकांनी या लसीचा पहिला डोस एका व्यक्तीला दिला आहे. आता यानंतर काही निरिक्षणं नोंदवून याची पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यानंतर लवकरच ही लस सर्वसामान्यांना बाजारात उपलब्ध होणार आहे. सिएटलच्या कॅन्सर पर्मानन्ट वाशिंग्टन हेल्थ रिसर्च इंस्टीट्यूटने (Kaiser Permanente Washington Research Institute ) ही लस विकसित केली आहे. असोसिएटेड प्रेस या न्यूज एजन्सीने याबाबत वृत्त दिलं आहे.

असोसिएटेड प्रेसनुसार, कॅन्सर परमानन्ट वाशिंग्टन रिसर्च इंस्टीट्यूटच्या वैज्ञानिकांनी अत्यंत कमी कालावधीत कोरोना व्हायरसवर ही लस शोधून काढली आहे (Covid-19 Vaccine). सोमवारी (16 मार्च) त्याची पहिली चाचणी घेण्यात आली. यात एका वॉलन्टिअरच्या हातावर ही लस टोचण्यात आली.

या संस्थेचे संशोधक डॉ. लिसा जॅक्सन म्हणाले, “आम्ही कोरोना व्हायरस टीम आहोत. प्रत्येकाला वाटतं की आणीबाणीच्या काळात जे शक्य आहे ते करावं. आम्ही तेच करतो आहोत.” कोरोनाच्या या लसीचा पहिला डोस एका छोट्या टेक कंपनीच्या ऑपरेशन मॅनेजरला देण्यात आली. या व्यतिरिक्त आणखी 45 वॉलन्टिअर्सला देखील एका महिन्याच्या आत ही लस देण्यात येईल. त्यानंतर त्यांच्यावरील परिणामांचा अभ्यास करण्यात येईल.

कोरोना लस बाजारात येण्यासाठी 12 ते 18 महिने लागणार

अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे (NIH USA) डॉ. एन्थोनी फॉसी (Dr. Anthony Fauci) म्हणाले, “सोमवारी झालेली चाचणी कोरोना लसीबाबत पहिलं पाऊल आहे. यामुळे या लसीचा रुग्णांवर व्यवस्थित परिणाम होतो की नाही याची माहिती मिळेल. जर हे संशोधन योग्यप्रकारे पुढे गेलं, तर पुढील 12 ते 18 महिन्यात लस सामान्यांसाठी बाजारात उपलब्ध होईल.”

संबंधित बातम्या:

Maharashtra corona death | महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी, बाधिताच्या संपर्कात 9 जण

Maharashtra Corona: महाराष्ट्राला किंचित दिलासा, 15 तासात एकही नवा रुग्ण नाही : राजेश टोपे

पुण्यात तीन दिवस व्यापार बंद, मात्र किराणा, दूध, औषधे, भाजीपाला सुरु राहणार

Corona Updates: शिर्डीचे साईबाबा मंदिर आजपासून बंद

7000 मृत्यू, अमेरिकेत संचारबंदी, फ्रान्स लॉकडाऊन, कोरोनासमोर महाशक्तिशाली देशही हतबल

CoronaVirus: अमेरिकेत कोरोनावरील पहिल्या लसीची चाचणी, लवकरच बाजारात उपलब्ध होणार

First Vaccine on Corona Virus

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.