बेशिस्तांवर कारवाईचा जालीम उपाय, पोलिसांच्या मदतीला आता तृतीयपंथींची फौज

मनमाड शहर प्रशासनाने नवी शक्कल लढवली आहे. या ठिकाणी पोलिसांनी चक्क तृतीयपंथीयांना रस्त्यावर उतरवलं आहे. (manmad transgender help corona virus)

बेशिस्तांवर कारवाईचा जालीम उपाय, पोलिसांच्या मदतीला आता तृतीयपंथींची फौज
NASHIK CORONA
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 5:55 PM

नाशिक : राज्यात कोरोनाचे रुग्ण (Corona virus) मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत असल्यामुळे परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. नाशिकमधील मनमाडमध्येसुद्धा रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सध्या संचारबंदी लागू करण्यात आलेली असूनसुद्धा येथे लोक सर्रासपणे बाहेर पडत आहेत. या पार्श्वभूमीवर लोक ऐकत नसल्यामुळे मनमाड शहर प्रशासनाने नवी शक्कल लढवली आहे. रस्त्यावरची गर्दी कमी करण्यासाठी  नांदगाव तालुक्यात बेशिस्तांवर कारावाईचा जालीम उपाय म्हणून पोलिसांनी तृतीयपंथीयांची (third gender) फौज रस्त्यावर उतरवली आहे. (Nashik Manmad Piolice taking help from transgender third gender to control Corona virus spreading)

नागरिकांना समजावण्यासाठी तृतीयपंथी मैदानात

मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीने बेशीस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र तरीही काही नागरिक हे अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गावात विनाकारण फिरताना आढळतायत. यासाठी मनमाड शहर पोलिसांनी नवी शक्कल लढवली असून पोलिसांनी चक्क तृतीयपंथीयांना रस्त्यावर उतरवले आहे. नागरिकांनी विनाकारण फिरू नये असे आवाहन या तृतीयपंथीयांकडून करण्यात येत आहे.

कुटुंबीयांसाठी बाहेर पडू नका, हात जोडून तृतीयपंथीयांची विनंती

सध्या संचारबंदी लागू असूनसुद्धा जे नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. त्यांना हे तृतीयपंथी हात जोडून विनंती करत आहेत. ते “आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी नियम पाळा आणि गावात विनाकारण फिरू नका,” असे आवाहन बाहेर फिरणाऱ्यांना करत आहेत.

घराबाहेर पडू नका, पोलिसांचे आवाहन

कोरोनाचा संसर्ग वाढला असला तरी मनमाड आणि नांदगाव तालुक्यात नागरिक बाहेर फिरताना दिसत आहेत. नागरिक ऐकत नसल्यामुळे पोलिसांनी तृतीयपंथीयांची मदत घेतली आहे. आतातरी नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरणे बंद करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पाहा व्हिडीओ :

नाशिकमध्ये ऑक्सिजनअभावी 22 जणांचा मृत्यू

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात आज (21 एप्रिल) दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर काही तास रुग्णालयात गोंधळ पाहायला मिळाला. रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी तडफडत होते. तर दुसरीकडे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात होते. जवळपास एक दीड तासानंतर ही ऑक्सिजन गळती थांबवण्यात आली. या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण मृत्यूच्या दाढेत असल्याचे बोललं जात आहे.

इतर बातम्या :

Corona Cases and Lockdown News LIVE :मीरा भाईंदर रेमडेसिव्हीरचा काळाबाजार, दोघांना अटक

Nashik Oxygen Tank Leak | नाशिकमध्ये मृत्यूचं तांडव, 22 जणांचा गुदमरुन मृत्यू, नेमकं काय घडलं?

(Nashik Manmad Piolice taking help from transgender third gender to control Corona virus spreading)

Non Stop LIVE Update
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.