मनसे अध्यक्ष राज ठाकरे चार दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. देशामध्ये बदलाचे वारे सुरू झाल्यानंतर कमबॅकची अचूक संधी साधण्यासाठी आणि संघटना बळकट करण्यासाठी राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे या दौऱ्यामध्ये राज ठाकरे यांनी नाशिकच्या ग्रामीण भागावरही लक्ष केंद्रीत केलंय. नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी राज ठाकरेंचं जंगी स्वागत केलं जातंय. नाशिक हा एकेकाळचा मनसेचा बालेकिल्ला.. नाशिककरांनी […]
नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी राज ठाकरेंचं जंगी स्वागत केलं जातंय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे चार दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. देशामध्ये बदलाचे वारे सुरू झाल्यानंतर कमबॅकची अचूक संधी साधण्यासाठी आणि संघटना बळकट करण्यासाठी राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत.विशेष म्हणजे या दौऱ्यामध्ये राज ठाकरे यांनी नाशिकच्या ग्रामीण भागावरही लक्ष केंद्रीत केलंय.नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी राज ठाकरेंचं जंगी स्वागत केलं जातंय.नाशिक हा एकेकाळचा मनसेचा बालेकिल्ला.. नाशिककरांनी राज ठाकरे यांना भरभरून प्रतिसाद देत तब्बल 40 नगरसेवक आणि तीन आमदार निवडून दिले. मात्र मधल्या काळामध्ये मोदी लाटेत मनसेचा नाशिकमध्ये धुव्वा उडाला.राज ठाकरे आणि नाशिककरांचं वेगळंच नातं आहे. राज ठाकरे शिवसेनेत असल्यापासून त्यांना नाशिकबद्दल आपुलकी आहे. मनसेची सत्ता हातात आल्यानंतर राज ठाकरे यांनी शहरात अनेक विकासकामं केली.राज ठाकरे सध्या महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. नुकताच त्यांनी मराठवाडा आणि विदर्भ दौरा केला. आता खान्देशातही मनसेचं संघटन मजबूत करण्यावर ते भर देण्याचा प्रयत्न करत आहेत.