AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता होण्यामागे राजकीय कनेक्शन, मुलाकडून धक्कादायक आरोप

यामागे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोपही कपिल यांनी केला आहे. (Pune Missing Businessman Gautam Pashankar may Get Kidnapped allegations from his son)

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता होण्यामागे राजकीय कनेक्शन, मुलाकडून धक्कादायक आरोप
| Updated on: Oct 29, 2020 | 9:07 AM
Share

पुणे : गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेले पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गौतम यांचे सुपूत्र कपिल पाषाणकर यांनी वडिलांच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला आहे. तसेच यामागे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोपही कपिल यांनी केला आहे. (Pune Missing Businessman Gautam Pashankar may Get Kidnapped allegations from his son)

गौतम पाषाणकरण यांच्या अचानक बेपत्ता होण्यामागे काहीतरी राजकीय कनेक्शन आहे. या पार्श्वभूमीवर कपिल पाषाणकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली आहे. त्यावेळी त्यांनी या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचा दावा केला आहे. तसेच त्या राजकीय व्यक्तीची माहिती त्यांनी पुणे पोलिसांना दिली आहे.

“या प्रकरणी स्वत: ती राजकीय व्यक्ती नाही, पण त्यांच्याशी संबंधित असलेला व्यक्ती असण्याची शक्यता आहे. वडिलांना ज्या काही आर्थिक अडचणी होत्या किंवा जे काही त्यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. त्याची चौकशी आम्ही केली, तेव्हा गेल्या दोन ते तीन महिन्यात नेमकं काय घडलं होतं, त्यांना एवढा तणाव कशामुळे होता, याची ड्राईव्हर किंवा इतरांकडून माहिती घेतली. त्यात एक जो व्यक्ती आहे, तो सतत त्यांना पैशासाठी धमकी द्यायचा. त्याने वडिलांवर केस केली होती,” अशी प्रतिक्रिया गौतम यांचा मुलगा कपिल पाषाणकर यांनी दिली.

“त्या पार्श्वभूमीवर मी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. पुणे पोलीस यांच्याकडून फार प्रयत्न केले जात आहेत. त्यांचे प्रयत्न समोर येत आहे. मी पोलीस तपासावर समाधानी आहे. यात कुठेही राजकीय दबाव येऊ नये असं मला वाटतं, म्हणून मी भेट घेतली,” असे कपिल पाषाणकर यांनी सांगितले.

आठ दिवसांपूर्वी बेपत्ता

ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून बेपत्ता आहेत. या प्रकरणी नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस त्यांचा कसोशीने शोध घेत आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून 64 वर्षीय गौतम पाषाणकर बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पाषणकर हे बुधवारी दुपारी लोणी काळभोर परिसरात कामानिमित्त बाहेर पडले होते. तिथून ते पानशेतला कामासाठी जात असल्याचं सांगून गेले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला.

नातेवाई, कार चालक आणि ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनीही पाषाणकर यांना अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क न झाल्यानं त्यांची शोधाशोध सुरु झाली. या प्रकरणी सध्या पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

ड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात सुसाईड नोट

गौतम पाषाणकर यांनी लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. त्यांनी आपल्या ड्रायव्हरकडे बंद लिफाफा दिला होता. घरी गेल्यानंतर शंकर यांच्या पत्नीने उघडून बघितल्यावर त्यात सुसाईड नोट होती.

गेल्या काही दिवसांपासून व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा उल्लेख या नोटमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे पाषाणकर तणावाखाली होते. ही सुसाईड नोट सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पाषाणकर यांचे कुणाशी वैर होते का? ते कुठे गेले असतील? बेपत्ता होण्यामागचं कारण काय असावं, या सगळ्या प्रकरणी पोलिसांकडून सध्या तपास सुरु आहे. (Pune Missing Businessman Gautam Pashankar may Get Kidnapped allegations from his son)

संबंधित बातम्या : 

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, शोध सुरु

ड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात ‘सुसाईड नोट’, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध सुरु

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.