AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्तीसगडमध्ये पाच महिलांसह सात नक्षलवाद्यांचा खात्मा

नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये 28 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत ‘नक्षली आठवडा’ जाहीर केला होता. यादरम्यान, ते जिल्ह्यातील नक्षल प्रभावित भागांमध्ये नक्षली कारवाया घडवून आणत होते.

छत्तीसगडमध्ये पाच महिलांसह सात नक्षलवाद्यांचा खात्मा
| Updated on: Aug 03, 2019 | 6:13 PM
Share

रायपूर : छत्तीसगडच्या राजनांदगावात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. राज्याचे पोलीस महासंचालक डी.एम. अवस्थी यांनी याबाबची माहिती दिली. तसेच, सर्च ऑपरेशन अद्यापही सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली. या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे.

‘नक्षली आठवडा’दरम्यान कारवाई

नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये 28 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत ‘नक्षली आठवडा’ जाहीर केला होता. यादरम्यान, ते जिल्ह्यातील नक्षल प्रभावित भागांमध्ये नक्षली कारवाया घडवून आणत होते. दुसरीकडे, छत्तीसगड पोलिसांनीही या नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु केलं. दरम्यान राजनांदगाव जिलह्यातील नक्षल प्रभावित भागातील डोंगराळ प्रदेशातील जंगलात नक्षलवाद्यांचे 40 ते 50 प्रमुख असल्याची सूचना सुरक्षा दलाला मिळाली.

सूचनेनुसार, जिल्हा पोलीस दल, डीआरजी आणि सीएएफने संयुक्तरित्या कारवाई केली. सीतागोटा येथून 10 किलोमीटर आत जंगलात गेल्यानंतर नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात सुरक्षा दलानेही गोळीबार केला. जवळपास दोन तास चाललेल्या या चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलं. यामध्ये पाच महिला आणि दोन पुरुष मक्षलवाद्यांचा समावेश होता.

चकमकीदरम्यान, सुरक्षा दल आपल्यावर भारी पडत असल्याचं दिसताच नक्षलवाद्यांनी जंगलातून पळ ठोकला. घटनास्थळावरुन पोलिसांनी पाच महिला आणि दोन पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. त्याशिवाय, एके-47, 303 रायफल, 12 बोर बंदूक, सिंगल शॉट रायफल, प्रेशर बॉम्ब, गोळादारु आणि मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त केलं.

संबंधित बातम्या :

शिक्षकांचा प्रताप, विद्यार्थ्यांना शाळेतच बलात्काराचे प्रात्यक्षिक

पत्नीला पणाला लावून दारुडा नवरा जुगारात हरला, मित्रांकडून गँगरेप

जालना सामुहिक बलात्कार प्रकरण, पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक

मुंबईत कॉलेज विद्यार्थिनीची छेड, दूधवाल्याला बेड्या

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.