काम बंद, कमाई बंद, पण दारु सुरु हे करण्यामागचे रहस्य काय? डॉ. अभय बंग यांचा सरकारला सवाल

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात सरकारने दारुबंदी उठवल्याच्या निर्णयावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे (Dr Abhay Bang on wine shop permission amid corona).

काम बंद, कमाई बंद, पण दारु सुरु हे करण्यामागचे रहस्य काय? डॉ. अभय बंग यांचा सरकारला सवाल

गडचिरोली : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात सरकारने दारुबंदी उठवल्याच्या निर्णयावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे (Dr Abhay Bang on wine shop permission amid corona). तसेच काम बंद, कमाई बंद, पण दारु सुरु हे करण्यामागचे रहस्य काय? असा सवाल सरकारला विचारला आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत कोरोना प्रसार थांबवण्यासाठी अतिशय स्तुत्य पावलं उचलली. मात्र रविवारी (3 मे) लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपता संपता देशातील रेड झोनमधील प्रतिबंधित क्षेत्र वगळता बाकी सर्वच ठिकाणी दारुबंदी उठवली. हा निर्णय अतर्क्य आणि तितकाच धोक्याचा असल्याची प्रतिक्रिया डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. अभय बंग म्हणाले, “कोरोनामुळे शासनाने महिनाभरापासून दारु, खर्रा आणि तंबाखूवर बंदी घातली होती. त्याचा हजारो पटीने फायदा या काळात झाला. ही बंदी कायम ठेवली असती, तर लोकांचा आणखी फायदा झाला असता. पण दुर्दैव असे की दारुमुळे मार खाणारी जनता बोलत नाही. ती उलट दारुच्या दुकानसमोर रांग लावते. जनतेचे हित आणि आरोग्य हा जर शासनाचा हेतू आहे, तर अशा निर्णयामुळे त्यावर पाणी फेरले जात आहे.”

भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंपेक्षा दारुमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या हजार पट जास्त

डॉ. अभय बंग यांनी यावेळी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची आणि दारुमुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी मांडत दारुचे भयानक परिणामही लक्षात आणून दिले. ते म्हणाले, “आजच्या तारखेपर्यंत भारतात 42 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर 1300 हून अधिक मृत्यू झाले आहेत. ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. पण त्याचवेळी भारतात दरवर्षी दारुमुळे पाच लाख मृत्यू होतात. भारतातील 5 कोटी लोकांना दारुच्या व्यसनाने ग्रासल्याचे जागतिक आरोग्य संघटना सांगत आहे. म्हणजे कोरोना संसर्ग आणि त्यामुळे होणार्‍या मृत्यूंपेक्षा दारुचे व्यसन आणि त्यामुळे भारतात होणारे मृत्यू हजारपटीने जास्त आहेत. कोरोना फैलाव रोखण्यासाठी अनेक प्रकारची बंदी कायम ठेवताना शासनाने दारुच्या विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे शासनाने हत्ती सोडला आणि शेपूट धरुन ठेवले आहे. त्यामुळेच हे अतर्क्य पाऊल आहे.”

“दारु दुकानं सुरु करणं म्हणजे घरपोच हिंसा आणि कोरोना पोहचवण्याची योजना”

दारुची दुकाने उघडल्याने तेथे गर्दी होणार आणि सुरक्षित अंतर पाळले जाणार नाही ही शक्यता जास्त आहे. तिथे नियमही तोडले जातील. या गर्दीमधून पुरुष दारुच्या बाटलीवाटे घरी कोरोना घेऊन येतील. सोबतच घरपोच हिंसाही घेऊन येतील. त्यामुळे शासनाच्या या निर्णयामुळे लोकांना घरपोच कोरोना पोहोचवण्याची योजना निर्माण होईल, असं डॉ. अभय बंग यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या :

Corona Updates: महाराष्ट्रात 771 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकूण आकडा 14 हजार 541 वर

सरकारनं उत्पन्न चांगल्या मार्गाने वाढवावं, पापाचा कर नको : डॉ. अभय बंग

कोरोना विरुद्धच्या युध्दात युवकांची भूमिका काय? : डॉ.अभय बंग

चंद्रपूरमध्ये दारुबंदीची समीक्षा की दारुची मार्केटींग मोहीम? : डॉ. अभय बंग

देशभक्ती पाहिजे, दारुभक्ती नको : डॉ. अभय बंग

चंद्रपूरमधील दारुबंदीचा पुनर्विचार केला नाही, अजित पवारांचा डॉ. अभय बंगांकडे खुलासा

BLOG: जीएसटी, गुटखा-खर्राबंदी, आरक्षण हवं की नको यासाठी समीक्षा समिती नेमणार का?

Dr Abhay Bang on wine shop permission amid corona

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI