पिंपल्समुळे चेहऱ्यावरील काळे डाग जात नाहीये? तर ‘या’ 5 नैसर्गिक फेसपॅकच्या मदतीने ही समस्या करा दूर
बऱ्याचदा चेहऱ्यावर मुरुमांचे डाग पडतात. कधीकधी हे डाग तसेच राहतात. जर तुम्हालाही तुमच्या चेहऱ्यावरील डागांचा त्रास होत असेल, तर ते हलके करण्यासाठी तुम्ही हे फेस पॅकचा वापर करू शकता. चला तर मग आजच्या या लेखात आपण या फेसपॅक बद्दल जाणुन घेऊयात...

बदलत्या वातावरणामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर मुरूम तसेच पुरळच्या समस्या सतावत असतात. त्यात पावसाळा ऋतूमध्ये अनेकांच्या चेहऱ्यावर दमट वातावरणामुळे पिंपल्स येतात. तर ही त्वचेसंबंधीत एक सामान्य समस्या आहे. अशातच चेहऱ्यावरचे पिंपल्स फुटल्यावर त्याचे काळे डाग आपल्या त्वचेवर तसेच राहतात. हे डाग काही दिवसांनी त्वचेवरून निघून जातात किंवा तसेच राहतात. ज्यामुळे त्वचेवर हे काळे डाग व्यवस्थित दिसत नाही. चेहऱ्यावरचे हे काळे डाग घालवण्यासाठी अनेकजण हे केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर करतात. पण काळांतराने त्यांचा परिणाम फारसा जाणवत नाही, त्यामुळे चेहरा आणखीन खराब होतो. अशातच नैसर्गिक फेस पॅक वापरणे हा एक सुरक्षित आणि प्रभावी पर्याय आहे.
कारण नैसर्गिक फेसपॅक त्वचेला नुकसान न पोहोचवता चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. चला तर मग आजच्या या लेखात आपण चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी कोणते फेसपॅक लावू शकतो त्याबद्दल जाणून घेऊयात.
हळद आणि दह्याचा फेस पॅक
हळदीमध्ये दाहक-विरोधी आणि जीवाणूविरोधी गुणधर्म असतात , जे त्वचेवरील डाग कमी करतात. तर दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते, जे त्वचेला एक्सफोलिएट करते. यापासून तुम्ही फेसपॅक बनवून त्वचेवर लावू शकता.
साहित्य-
1 चमचा हळद पावडर 2 चमचे ताजे दही
फेसपॅक कसा बनवायचे?
हळद आणि दही मिक्स करून पेस्ट बनवा.
आता हा तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे सुकू द्या. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा हा घरगुती फेसपॅकचा वापर करा.
कोरफड आणि मधाचा फेस पॅक
कोरफड त्वचेला हायड्रेट करते आणि डाग हलके करते, तर मध त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि उजळवते .
फेसपॅक बनवण्याचे साहित्य-
2 चमचे कोरफड जेल 1 चमचा मध
फेसपॅक कसे बनवायचे?
कोरफड जेल आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा.
20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.
आठवड्यातून 2-3 वेळा हा फेसपॅक तुम्ही लावू शकता.
बेसन आणि लिंबाचा फेस पॅक
बेसन त्वचेतील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते आणि लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे पेगमेंटेशनची समस्या कमी होते.
बेसन आणि लिंबाचा फेस पॅक बनवण्याचे साहित्य-
2 चमचे बेसन
1 चमचा लिंबाचा रस
गुलाब पाणी
कसे बनवायचे?
बेसन आणि लिंबाचा रस मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात गुलाबपाणी मिक्स करून पेस्ट तयार करा.
तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या. हा पॅक सुकल्यानंतर हलक्या हाताने घासून चेहरा स्वच्छ धुवा.आठवड्यातून दोनदा बेसन लिंबाचा फेसपॅकचा वापर करू शकतात.
संत्र्याची सालीची पावडर आणि दुधाचा फेस पॅक
संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेला उजळवते आणि दूध त्वचेला मऊ बनवते.
साहित्य-
1 टीस्पून संत्र्याच्या सालीची पावडर
1 टीस्पून कच्चे दूध
फेस पॅक बनवायची पद्धत
संत्र्याच्या सालीची पावडर आणि कच्चे दूध दोन्ही मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. तुम्ही हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा लावू शकता.
टोमॅटो आणि साखरेचा स्क्रब
टोमॅटोमध्ये लायकोपिन असते, जे त्वचा स्वच्छ करते आणि साखर एक नैसर्गिक स्क्रब आहे.
साहित्य-
1 टोमॅट्याची पेस्ट
1 चमचा साखर
फेसपॅक बनवायची पद्धत
टोमॅटोच्या पेस्टमध्ये साखर मिक्स करून फेसपॅक तयार करा. आता ही पेस्ट चेहरा हळूवारपणे घासून घ्या आणि 10 मिनिटांनी चेहरा धुवा. आठवड्यातून 1-2 वेळा हा फेसपॅक वापरू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
