आवळ्याच्या रसाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर

आवळ्याला एक सुपर फूड मानले जातो. आवळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

आवळ्याच्या रसाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर
आवळा

मुंबई : आवळ्याला एक सुपर फूड मानले जाते. आवळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आवळा चयापचय क्रिया सुरळीत करण्यात मदत करतो. तसेच, कोलेस्ट्रोल कमी करण्यास देखील मदत करतो. आवळात व्हिटामिन बी 5, व्हिटामिन बी 6, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध आहे. आज आपण आवळा रसांच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे या काळात तुमची प्रतिकारशक्ती वाढू शकते. (Amla juice is very beneficial for health)

एक ते दोन आवळे कापून, त्यात एक चमचा आल्याचा रस मिसळा. त्यात 3 ते 4 पुदीना पाने आणि कोमट पाणी टाकून वाटून घ्या. यानंतर या रसात काळे मीठ आणि चाट मसाला घालून सेवन करा. आवळा-जिऱ्याचा रस बनवण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे तुम्ही एक चमचा जिरे एक रात्र आधी किंवा सकाळी पाण्यात भिजवून ठेवून, काही काळाने गाळून आवळ्याच्या रसामध्ये ते जिरे वाटून त्याचे सेवन करू शकता.

दुसरे म्हणजे कप आवळ्याच्या रसात थोडाशी जिरेपूड टाकून तो पिऊ शकता. वजन कमी करण्याव्यतिरिक्त आवळा पोषक तत्व आणि अॅन्टीऑक्सिडंटने परिपूर्ण असतो, त्यामुळे आरोग्यासाठी आवळा अत्यंत गुणकारी आहे. आवळा ताप, घशातील खवखव किंवा समस्या, ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी, फुफ्फुसांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत करतो, तसेच वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठीही आवळा मदत करतो.

आवळा हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतो. आवळा शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करून चांगलं कोलेस्ट्रॉल तयार करण्याचं काम करतो. जर पोटात होणाऱ्या समस्या जसं, जळजळ, गॅस यांसारख्या समस्याही दूर करतो. त्यामुळे दिवसातून दोन वेळा आवळ्याचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं. आवळा डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठीही मदत करतो.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Amla juice is very beneficial for health)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI