AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin | त्वचेचा पोत चांगला ठेवण्यासाठी या खास टिप्स फाॅलो करा आणि सुंदर त्वचा मिळवा!

रात्री झोपण्यापूर्वी आपली त्वचा पूर्णपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या त्वचेची बंद छिद्रे उघडतात आणि त्वचेला योग्य प्रकारे श्वास घेता येतो. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. त्वचा स्वच्छ करण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा, ते तुमची त्वचा घट्ट ठेवण्याचे काम करते. बरेच लोक कोमट पाण्याने रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुतात.

Skin | त्वचेचा पोत चांगला ठेवण्यासाठी या खास टिप्स फाॅलो करा आणि सुंदर त्वचा मिळवा!
Image Credit source: unsplash.com
| Edited By: | Updated on: Jun 02, 2022 | 9:25 AM
Share

मुंबई : आपल्या त्वचेचा (Skin) पोत चांगला असणे खूप आवश्यक आहे. त्वचेचा पोत चांगला ठेवण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे रात्री झोपण्याच्या अगोदर काही गोष्टी आपण फाॅलो केल्या पाहिजेत. आपली त्वचा प्रदूषण, घाण आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कात सतत असल्यामुळे घाण होते. जेव्हा आपण रात्री त्वचा स्वच्छ करतो तेव्हा त्वचेवरील घाण निघून जाते. तसेच, त्वचा रात्रीच्या वेळी बरी होते. रात्रीच्या वेळी त्वचेतील रक्तप्रवाहही (Blood flow) वाढतो, त्यामुळे त्वचेच्या पेशी लवकर चांगल्या होतात. तुम्हालाही तुमची त्वचा सुधारायची असेल तर रोज झोपण्यापूर्वी काही महत्वाच्या टिप्स फाॅलो कराव्यात. ज्यामुळे आपल्या त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होईल. शिवाय नेहमीच रात्री (Night)झोपण्यापूर्वी आपला चेहरा थंड पाण्याने धुणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेवरील तेल निघून जाण्यास मदत होते.

त्वचा स्वच्छ करा

रात्री झोपण्यापूर्वी आपली त्वचा पूर्णपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या त्वचेची बंद छिद्रे उघडतात आणि त्वचेला योग्य प्रकारे श्वास घेता येतो. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. त्वचा स्वच्छ करण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा, ते तुमची त्वचा घट्ट ठेवण्याचे काम करते. बरेच लोक कोमट पाण्याने रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुतात. मात्र, ही सवय अत्यंत चुकीची आहे.

हर्बल फेसमास्क

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर हर्बल फेसमास्क लावणे खूप फायदेशीर ठरते. यामुळे आपली त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तर मुलतानी माती आणि काकडीचा फेसमास्क नेहमीच आपल्या त्वचेला लावायला हवा. यामुळे आपली त्वचा सुंदर आणि तजेलदार होण्यास मदत होते. हे फेसमास्क आपली त्वचा हायड्रेट करण्यास मदत करतात. मात्र, हे फेसपॅक रात्री झोपण्यापूर्वी लावणे फायदेशीर ठरते.

मॉइश्चरायझर

उन्हाळ्याच्या हंगामात कोरड्या त्वचेची समस्या अधिक निर्माण होते. बरेच लोक ही कोरडी त्वचा दूर करण्यासाठी अनेक उपाय करतात. मात्र, काहीही उपयोग होत नाही. मग अशावेळी आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या चेहऱ्यासह हात आणि पायांना मॉइश्चरायझर, क्रीम, लोशन लावावे. यामुळे आपली त्वचा मॉइश्चराइझ राहील. अनेकजण फक्त हिवाळ्याच्या हंगामामध्येच त्वचेला मॉइश्चरायझर लावतात आणि उन्हाळ्यात नाही. पण आपल्या त्वचेसाठी मॉइश्चरायझर बारीही महिने लावणे फायदेशीर ठरते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....