hair care: पुरुषांमध्ये केस गळण्याचे ‘हे’ ३ प्रमुख मोठी लक्षणे, दुर्लक्ष करू नका
जर तुमच्या डोक्यावरून अधिक केस गळत असतील तर हे टक्कल पडण्याची लक्षणे असू शकतात. यासाठी तुम्हाला यावर लगेच उपचार घेणे आवश्यक आहे. टक्कल पडण्याच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात...

केस गळणे ही आता एक सामान्य समस्या आहे. विशेषतः पुरुषांमध्ये ही समस्या अधिक जाणवू लागली आहे. वारंवार केस गळतीमुळे टक्कल देखील पडू शकते. यामध्ये असे अनेक पुरूष आहेत जे वेळेवर जेवण करत नाही तसेच योग्य आहार घेत नाहीत किंवा पुरेशी झोप घेत नाहीत. अशा पुरुषांमध्ये केस गळण्याची समस्या अधिक वाढू शकते. याशिवाय कामांचा ताणतणाव व अनुवांशिकतेमुळे देखील केस गळतात
त्वचारोगतज्ञ सांगतात की कोणत्याही व्यक्तीच्या डोक्यावर केस नसल्यास त्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. टक्कल पडण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे केसांमधील बदल, जे कालांतराने दिसून येतात. तुम्ही जर वेळीच खबरदारी घेतली तर टक्कल पडण्याची समस्या टाळता येऊ शकते. कोणत्या लक्षणांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये हे तज्ज्ञांकडून जाणून घ्या.
केस पातळ होणे
केस पातळ होणे हे टक्कल पडण्याचे लक्षण आहे. जर तुमचे केस पूर्वीपेक्षा खूपच पातळ आणि कमकुवत झाले असतील तर ते टक्कल पडण्याचे लक्षण असू शकते. सहसा हा बदल डोक्याच्या काही भागात होतो. जसे की कपाळाजवळ किंवा डोक्यावरच्या भागातील केस कमकुवत होऊन गळणे. अशाने काही दिवसानानंतर तुमच्या कपाळावरील आणि डोक्यावरील केस कमी दिसू लागतात.
डोक्याच्या वरील भागातील केस गळणे
टक्कल पडण्याचे आणखी एक प्रमुख लक्षण म्हणजे डोक्याच्या वरच्या भागातील केस गळणे. अशा वेळेस डोक्याच्या मध्यभागी किंवा कपाळाजवळील केस हळूहळू कमी होऊ लागतात. बहुतेकदा हे पुरुषांमध्ये दिसून येते. हे अनुवांशिकतेमुळे देखील होऊ शकते.
केसांचे अकाली पांढरे होणे
साठीनंतर केस पांढरे होणे सामान्य आहे, परंतु जर तुमचे केस खूप लवकर पांढरे होऊ लागले तर हे देखील टक्कल पडण्याचे लक्षण असू शकते. याचा अर्थ असा की तुमच्या केसांची मुळे कमकुवत होत आहेत आणि केसांची नीट वाढ होत नाहीये. याशिवाय हे अनुवांशिक कारणांमुळे देखील होऊ शकते, परंतु जर हे खूप लवकर होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
