बिर्याणी ठरू शकते का ब्रेकअपचं कारण? व्हेज-नॉनव्हेज खाण्याच्या सवयी कशा बदलत आहेत भारताची ‘डेटिंग स्टोरी’
आजकालच्या नात्यांमध्ये जेवण केवळ पोटाची भूक भागवणारे किंवा चवीपुरते राहिलेले नाही, तर ते एक महत्त्वाचा भावनिक मुद्दा बनले आहे. मग, वेज-नॉनव्हेज खाण्याच्या सवयींमुळे नाती तुटतायत का? याबद्दल सविस्तर वाचूया...

पूर्वी नात्यांमध्ये संवाद, विचार आणि सवयींना जास्त महत्त्व दिले जायचे, पण आता खाण्याच्या आवडीनिवडीही नाती घडवू किंवा बिघडवू शकतात. खासकरून जेव्हा एक व्यक्ती शाकाहारी असते आणि दुसरी मांसाहारी, तेव्हा हा फरक सुरुवातीला छोटा वाटतो, पण वेळेनुसार ही छोटीशी गोष्ट एक मोठी समस्या बनू शकते. डेटवर जाण्यापूर्वी जेव्हा तुम्हाला विचार करावा लागतो की रेस्टॉरंटमध्ये काय मिळेल, माझ्या खाण्यामुळे समोरच्याला काही अडचण तर होणार नाही ना, तेव्हा हा मुद्दा केवळ चवीचा राहत नाही, तर तो विचार आणि समजुतीचा बनतो. भारतात जेवण केवळ खाण्यासाठी नाही, तर ते आपली ओळख, परंपरा आणि भावनांचा अविभाज्य भाग आहे. अशा परिस्थितीत जर दोन लोकांच्या खाण्याच्या सवयी वेगळ्या असतील, तर अनेकदा या गोष्टी नात्यात कटुता निर्माण करू शकतात. तर, बिरयाणी खरंच एखाद्या नात्याच्या ‘दी एंड’ला कारणीभूत ठरू शकते का? उत्तर आहे – होय
खाण्याच्या आवडीनिवडींचा संघर्ष आणि नात्यातील दुरावा:
जेव्हा एक शाकाहारी आणि दुसरा मांसाहारी असतो, तेव्हा बाहेर जेवणाची ऑर्डर देणे, स्वयंपाकघर शेअर करणे किंवा एकत्र प्रवासाला जाणे थोडे आव्हानात्मक असू शकते. अनेकदा केवळ खाण्याच्या सवयींमुळे भांडणे होतात. कुणी म्हणतं, ‘तुझ्या खाण्याला वास येतो,’ तर कुणी चिडवतं, ‘तू फक्त गवत खातेस.’ हळूहळू या गोष्टी मस्करीतून वादात आणि वादातून दुराव्यात बदलतात. नातं तेव्हा कमकुवत होतं, जेव्हा तुम्ही समोरच्याच्या सवयींवरून त्याला जज करायला लागता. खरी समस्या बिरयाणी किंवा अंड्याची नसते, खरी बाब आदराची असते.
जर दोन लोकांच्या खाण्याच्या आवडीनिवडी वेगळ्या असतील, तर नातं चालूच शकत नाही असे नाही. अनेकदा लोक एकमेकांच्या आवडींना स्वीकारतात, समजून घेतात आणि एकमेकांसाठी थोडे जुळवून घेतात. काही जण मांसाहार सोडून देतात, तर काही जण समोरच्यासाठी खाण्यामध्ये बदल करतात. खरं तर, जेवण हे नात्यातील एक निमित्त बनतं; मूळात नात्यात भावना, समजूतदारपणा आणि आपुलकी असावी लागते. जर समोरची व्यक्ती म्हणाली की, “तू काय खातोस/खातेस, याचा मला फरक पडत नाही,” तर तिथूनच प्रेमाचा पाया मजबूत होतो.
भारतात जेवण केवळ चवीपुरते मर्यादित नाही, ते धर्म, संस्कार, आरोग्य आणि वैयक्तिक विश्वासांशी जोडलेले आहे. अनेक लोक नैतिक कारणांमुळे मांसाहार करत नाहीत, तर काही धार्मिक कारणांमुळे लसूण-कांदाही खात नाहीत. दुसरीकडे, काहींसाठी मांसाहार म्हणजे प्रोटीन आणि चवीचा स्रोत असतो. जेव्हा दोन व्यक्ती अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून येतात, तेव्हा संघर्ष होऊ शकतो. पण जर विचारांमध्ये लवचिकता असेल, तर हा संघर्ष नातं तोडण्याचं कारण बनत नाही.
यावर उपाय काय?
खाण्याच्या आवडीनिवडीवर मोकळेपणाने बोला. समोरच्याच्या निवडीचा आदर करा. गरज वाटल्यास स्वयंपाकघर किंवा भांडी वेगळी ठेवू शकता. काही अशा डिशेस शोधा ज्या दोघांनाही आवडतील. टोमणे मारणे आणि कमेंट्स करणे टाळा, समजूतदारपणा दाखवा. नात्यात बदल लादण्याऐवजी, एकमेकांच्या आवडींना समजून घ्या.
