मुलायम, चमकदार आणि सुंदर केस पाहिजेत? तर, आजच ‘हे’ घरगुती उपाय करा…

कमकुवत आणि निर्जीव केस केवळ आपल्या केसांची वाढ कमी करत नाहीत तर आपल्या केसांचे सौंदर्य देखील कमी करतात.

मुलायम, चमकदार आणि सुंदर केस पाहिजेत? तर, आजच 'हे' घरगुती उपाय करा…
पार्लरमध्ये जाऊन केस स्ट्रेट करण्यासाठी महिला बरेच पैसे घालतात. मात्र, आज आम्ही काही घरगुती टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे केस स्ट्रेट होतील. केस स्ट्रेट पॅक तयार करण्यासाठी आपल्याला एक कप दूध आणि एक अंड लागणार आहे. एक कप दुधात अंडी मिक्स करा आणि हा पॅक ब्रशने केसांवर लावा. अर्ध्या तासांसाठी पॅक केसांवर ठेवा आणि त्यानंतर फक्त शैम्पूने आपले केस धुवा. हा पॅक लावल्याने केस स्ट्रेट होतील.

मुंबई : कमकुवत आणि निर्जीव केस केवळ आपल्या केसांची वाढ कमी करत नाहीत तर आपल्या केसांचे सौंदर्य देखील कमी करतात. केसांना पुरेसे पोषण मिळाले तर आपले केस निरोगी राहू शकतात. कमकुवत केसांमुळे डोक्यातील कोंडापासून विभाजीत केसांच्या समस्या उद्भवतात, अशा केसांना संपूर्ण पोषण आवश्यक असते. मात्र अनेक उपाय करून देखील आपले केस चांगले होत नाहीत. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे केस मुलायम, चमकदार आणि सुंदर होतील. चला तर पाहूयात खास टिप्स…(Follow homemade tips for soft, shiny and beautiful hair)

-2 ते 3 चमचे बेकिंग सोडा घेऊन, त्यामध्ये थोडे पाणी मिक्स करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोक्याला लावून 10 ते 15 मिनिटांनी केस धुवून टाका. बेकिंग सोड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे केसांच्या समस्या कमी होतात.

-लिंबाचा रस काढून तो केसांच्या मुळाशी लावावा. 10 ते 15 मिनिटांनी केस आधी पाण्याने धुवून, पुन्हा शॅम्पूने धुवा. यामुळे केस चमकदार होतील आणि डोक्यातील कोंडा आणि खाजही दूर होण्यास मदत होईल. खोबरेल तेल केसांना मॉयश्चरायझ करण्याचे काम करते. खोबऱ्याचे तेल थोडसे कोमट करून त्याने डोक्याचा मसाज करावा. त्यामुळे कोंड्याची समस्या कमी होईल.

-जर आपले केस खूप वेगाने गळत असतील तर मेथी दाणे आपले केस गळणे थांबवतेच परंतु नवीन केसांना वाढण्यास देखील मदत करेल. मेथीमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन-सी, लोह, पोटॅशियम असे घटक आढळतात. यामुळे आपल्या केसांची मुळे मजबूत करण्यासाठी, त्यांच्या वाढीस मदत होते.

-केसांची नियमित काळजी घेताना केसांची मालिशही करावी. केसांची मसाज केल्यानंतर हलक्या हेअर कंडिशनरने केस धुवावेत. पॅराबेन आणि सल्फेट नसलेले हेअर कंडिशनर केसांच्या स्वास्थ्यासाठी चांगले मानले जातात. हे घटक नसलेले हेअर कंडिशनर वापरावेत. एका आठवड्यात दोन ते तीन वेळा केस धुवावेत.

-केसांखालच्या त्वचेवर कोमट ऑलिव्ह तेल लावल्याने केसांखालची स्कीन नरम पडते. यासाठी ऑलिव्ह तेल हातावर घेऊन हलक्या हातांनी डोक्यावरील त्वचेची मालीश करा. मालीश केल्यानंतर ऑलिव्ह तेल डोक्यावर काही तासांसाठी तसेच ठेवा. नंतर हर्बल शॅम्पूने केस धुवून घ्या.

-तूप केसांना हायड्रेट करते. केसांमध्ये ओलावा कमी झाल्यामुळे केस निस्तेज व खराब होतात. अशा केसांसाठी तूप उत्तम उपाय आहे. त्यात आढळणारे हेल्दी फॅटी अॅसिड स्कल्पचे पोषण करून केसांच्या मुळांना हायड्रेट करतात. ज्यामुळे केस मऊ होतात.

-कोरफड आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे केवळ आपल्या त्वचेची काळजी घेत नाही, तर आपल्या केसांसाठीही फायदेशीर ठरतात. यामुळे आपले केस चमकदार होतात. कोरफडयुक्त हेअर कंडिशनर बनवण्यासाठी, प्रथम कोरफडच्या पानांतून गर काढा. आता एक चमचे लिंबाचा रस, 4 चमचे कोरफड जेलमध्ये घाला. आता हे मिश्रण आपल्या केसांवर लावा आणि सुमारे 10 मिनिटे आपल्या केसांवर तसेच राहू द्या. 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने आपले केस स्वच्छ करा.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Follow homemade tips for soft, shiny and beautiful hair)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI