रात्रीच्या वेळी हे पदार्थ खाल्लात तर तुमच्या शरीरात वेगाने वाढेल युरिक ॲसिड, आजपासूनच राहा दूर
आजकाल जास्त प्रमाणात शरीरामध्ये युरिक अॅसिडची समस्या निर्माण होत आहे. जी अनेक लोकांना त्रास देत आहे. जर युरिक अॅसिड किडनीद्वारे योग्यरित्या काढून टाकले नाही तर ते वाढू लागते, ज्यामुळे संधिवात सारख्या समस्या उद्भवू शकतात. तर या समस्यांपासुन सुटका व्हावी यासाठी रात्री हे अन्नपदार्थांचे खाणे टाळा.

आजकाल बदलत्या जीवनशैलीसोबतच खाण्यापिण्याच्या सवयीमुळे युरिक ॲसिडचे प्रमाण वाढण्याची समस्या खूप सामान्य झाली आहे. शरीरात वाढत्या युरिक ॲसिडमुळे अनेकजण खूप त्रस्त आहेत. तर युरिक ॲसिड हे रक्तात तयार होणारे एक टाकाऊ पदार्थ आहे, जे प्युरिन नावाच्या केमिकल विघटनामुळे तयार होते. सहसा शरीरात तयार होणारे हे ॲसिड लघवीद्वारे बाहेर टाकले जाते, मात्र जेव्हा किडनी ते योग्यरित्या बाहेर टाकू शकत नाही तेव्हा त्याचे प्रमाण शरीरात वाढू लागते.
शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढल्याने अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामध्ये संधिवात, गाउट इत्यादींचा समावेश आहे. अशा परिस्थितीत वेळीच त्यावर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे. युरिक अॅसिड वाढण्यामागे अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक म्हणजे आहार. असे काही पदार्थ आहेत जे रात्रीच्या जेवणात खाल्ल्याने शरीरात युरिक अॅसिड वाढते. चला जाणून घेऊया या पदार्थांबद्दल…
डाळ
सामान्यतः प्रथिनांचा चांगला स्रोत मानल्या जाणाऱ्या डाळी शरीरात युरिक ॲसिड वाढवण्यास जबाबदार असतात. खरंतर काही डाळींमध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रात्री कोणत्याही डाळीचे सेवन केल्याने चयापचय प्रक्रिया मंदावते. म्हणून रात्री तूर, मसूर आणि चणाडाळ खाणे टाळा, कारण त्यात प्युरीनचे प्रमाण जास्त असते.
मांस
सहसा लोक रात्री मांस खातात, पण तुम्हाला माहिती आहे का की रात्रीच्या वेळेस मांस खाल्ल्याने यूरिक अॅसिड वाढू शकते. विशेषतः ऑर्गन मीट आणि रेड मीट जसे मटण, ज्यामध्ये भरपूर प्युरिन असते. अशा वेळेस रात्री याचे सेवन शरीरासाठी हानिकारक ठरू शकते, कारण याच्या सेवनाने पचनक्रिया मंदावते. रात्री मांस खाल्ल्याने सांध्यामध्ये यूरिक अॅसिड क्रिस्टल्स जमा होऊ शकतात, ज्यामुळे गाउटचा त्रास वाढू शकतो .
साखरयुक्त पदार्थ
रात्री साखरयुक्त पदार्थ खाल्ल्यानेही यूरिक अॅसिड वाढते . साखर, गोड पदार्थ, गोड पेये आणि फ्रुक्टोजयुक्त पदार्थ हे यूरिक ॲसिड वेगाने वाढवणाऱ्या पदार्थांमध्ये गणले जातात. रात्री गोड पदार्थ खाल्ल्याने यकृत आणि किडनीवर दबाव येतो. परिणामी, यूरिक ॲसिड वेगाने वाढते आणि रात्री गाउट वेदना किंवा सांधे सूज वाढू शकते.
फणस
अनेकांना फणसाची भाजी आवडते, पण तुम्हाला माहिती आहे का की रात्रीच्या वेळी फणस खाल्ल्याने यूरिक ॲसिडच्या रुग्णांच्या समस्या वाढू शकतात. खरं तर, त्यात भरपूर फ्रुक्टोज असते, जे लिवरमध्ये यूरिक अॅसिड तयार करते. फणस खाल्ल्याने सांधे सूज, किडनीच्या समस्या आणि संधिरोगाचा त्रास वाढू शकतो.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
