Weight loss Tips : पोटाची चरबी कमी करायचीय?, मग काय खायचं?, काय खाऊ नये?, वाचा, सविस्तर

वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करत असतात. त्यामध्ये जास्त करून आहारात बदल करतात.

Weight loss Tips : पोटाची चरबी कमी करायचीय?, मग काय खायचं?, काय खाऊ नये?, वाचा, सविस्तर
पोटावरची चरबी
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 2:01 PM

मुंबई : वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. वजन कमी करण्यासाठी जास्त करून आहारात बदल केला जातो. मात्र, हे करून देखील फारसा फरक पडत नाही. वजन काढण्याचे मुख्य कारण म्हणजे आहारातील कर्बोदकांमध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त असणे. यामुळे, आपल्या शरीरात चरबी जमा होण्यास सुरवात होते. वजन कमी करण्यासाठी आहारात कमी कार्बयुक्त पदार्थ समाविष्ट करा. अन्नात प्रोटीनचे प्रमाण जास्त असले पाहिजे आणि कॅलरीचे प्रमाण खूप कमी असावे. असे केल्याने आपले वाढलेले वजन झटपट कमी होते. (If you want to lose belly fat then follow these tips)

प्रथिनेयुक्त अन्न खा

आपल्या आहारात जास्त प्रथिनेयुक्त अन्नाचा समावेश करा. प्रथिनेयुक्त अन्न खाल्ल्याने आपले पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. शिवाय यामुळे आपले चयापयच वाढण्यास मदत होते. प्रथिनेयुक्त आहार घेतल्याने स्नायू बळकट होतात. आपण आहारात पोहे, ओट्स, सोयाबीन, मूग, मसूर, अंडी इत्यादींचा समावेश करू शकता. हे पदार्थ आहारात घेतल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.

जंक फूड खाऊ नका आपल्या सर्वांना माहित आहे की जंक फूड खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. या गोष्टींमध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅलरी खूप जास्त असतात. आपण पिझ्झा, बर्गर, बटाटा चिप्स, पास्ता आणि कुकीज खाणे टाळा. कारण हे सर्व मैद्यापासून तयार केले जाते, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

साखर खाणे टाळा

वजन कमी करण्यासाठी आहारात साखर घेणे बंद करा. याशिवाय कोल्ड्रिंक्स आणि गोड पेयांमध्ये जास्त प्रमाणात साखर असते, त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आपण पॅक केलेला रस ऐवजी ताजे रस प्या. या व्यतिरिक्त आपल्या आहारात हर्बल टी, ग्रीन टीचा समावेस करा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

प्रक्रिया केलेले अन्न टाळा  प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते. आपण आहारात जाम, चीज, प्रक्रिया केलेले मांस, पास्ता आणि नूडल्सचे सेवन करणे टाळले पाहिजे. या गोष्टींमध्ये जास्त प्रमाणात कॅलरी असतात. यामुळे याचे सेवन केल्याने आपले वजन वेगाने वाढते. यामध्ये कॅलरी जास्त प्रमाणात असतात.

तळलेल्या गोष्टी खाऊ नका जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आहारात जास्त कॅलरी आणि कार्बोहायड्रेट खाऊ नका. भजे, बटाटा पकोडा आणि तूपात बनवलेल्या गोष्टी खाल्ल्यास वजन वेगाने वाढते. यामुळे वजन कमी करायचे असेल तर या गोष्टी खाणे टाळाच

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(If you want to loss belly fat then follow these tips)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.