Buttermilk Recipes : साध्या ताकाचा कंटाळा आलाय?, मग या रेसिपी नक्की ट्राय करा…

तुम्ही साध्या ताकाला कंटाळले असाल तर ही अनोखी रेसिपी ट्राय करुन पाहा. (Buttermilk Recipes: Tired of simple Buttermilk?, then try this recipe for sure)

Buttermilk Recipes : साध्या ताकाचा कंटाळा आलाय?, मग या रेसिपी नक्की ट्राय करा...

मुंबई : उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्सचं (Cold Drink) सेवन करण्यात सर्वांना आनंद मिळतो. अशा परिस्थितीत, स्मूदी आणि आईस्क्रीमशिवाय (Ice Cream), आपण वेगवेगळ्या पाककृती देखील करू शकता. दह्यापासून बनविलेल्या ताकात कॅलरीज कमी असतात. या पेयामुळे तुमची भूक भागते. सोबतच डिहायड्रेशनपासून आपल्या शरीराचे रक्षण करते. जर तुम्ही साध्या ताकाला कंटाळले असाल तर ही अनोखी रेसिपी ट्राय करुन पाहा.

मॅंगो ताक – उन्हाळ्यात आंबा हा प्रत्येकाचा आवडता असतो. आंब्यापासून मजेदार लस्सीही तयार करता येते. यासाठी तुम्हाला 1 कप दही, 1 आंबा, 1 चमचा साखर आणि चिमूटभर वेलची पावडरची आवश्यकता असेल. आंब्याचा लगदा काढा आणि ब्लेंडरमध्ये मिक्स करुन घ्या. आता त्यात दही, साखर आणि वेलची पूड घाला. जाड मिश्रण करण्यासाठी ब्लेंड करा.

चॉकलेट ताक – तुम्हाला चॉकलेट आवडत असेल तर तुम्ही त्याचं मस्त ताक देखील तयार करू शकता. ही कृती केवळ मुलांनाच नाही तर सर्व वयोगटातील लोकांनाही आवडेल. यासाठी तुम्हाला 1 कप दही, 1 चमचा कोको पावडर, 2 चमचे साखर आणि चॉकलेट सॉसची गरज असेल. हे करण्यासाठी सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये घाला आणि गुळगुळीत होईपर्यंत मिश्रण करा. जर तुम्हाला वाटत असेल की ताकातील सुसंगतता खूप जाड आहे, तर त्यात अर्धा कप पाणी घाला. आता एका ग्लासमध्ये घ्या आणि चॉकलेट सॉससह सजवा आणि सर्व्ह करा.

स्ट्रॉबेरी ताक – उन्हाळ्यात कोणीही ताजं स्ट्रॉबेरी ताक तयार करू शकतं. यासाठी तुम्हाला 1 कप दही, 1 कप स्ट्रॉबेरी आणि 2 चमचे साखर आवश्यक असेल. हे करण्यासाठी प्रथम सर्व पदार्थांना ब्लेंडरमध्ये टाका आणि जाड मिश्रण करा.

बीट ताक – तुम्ही ताकात थोडं बीटरूट घालून निरोगी पौष्टिक मिश्रण तयार करू शकता. हे बीट ताक लोहयुक्त असतं आणि यात कॅलरीज कमी असतात. मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी हे पेय फायदेशीर ठरू शकतं. यासाठी तुम्हाला 1 कप दही, बीटरूट, जिरेपूड, चाट मसाला, 4 पुदीनाची पाने आणि चवीनुसार काळे मीठ लागेल. ते तयार करण्यासाठी, बीटचे तुकडे किसून घ्या आणि ब्लेंडरमध्ये ठेवा. आता त्यात दही, जिरेपूड, काळे मीठ, चाट मसाला आणि पुदीना पाने घाला. मिश्रण करण्यासाठी ब्लेंड करा.

संबंधित बातम्या

Skin Care : ग्लोईंग त्वचा हवी आहे? तर संत्रीच्या सालीचा आणि केळीचा ‘हा’ फेसपॅक वापरा!

कडक उन्हामुळे होणारी जळजळ आणि खाजेपासून मुक्त होण्यासाठी करा हे घरगुती उपाय

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI