हिवाळ्यात तिळाचे लाडू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या रेसिपी!

हिवाळ्याच्या हंगामामध्ये तिळाचे लाडू खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे बनवायला खूप सोपे आहेत. हे गूळ, शेंगदाणे आणि तिळापासून तयार केले जातात. तीळ हे त्यांच्या पौष्टिक फायद्यांसाठी ओळखले जातात, तर गूळ आरोग्यदायी आहे.

हिवाळ्यात तिळाचे लाडू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या रेसिपी!
तिळाचे लाडू


मुंबई : हिवाळ्याच्या हंगामामध्ये तिळाचे लाडू खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे बनवायला खूप सोपे आहेत. हे गूळ, शेंगदाणे आणि तिळापासून तयार केले जातात. तीळ हे त्यांच्या पौष्टिक फायद्यांसाठी ओळखले जातात, तर गूळ आरोग्यदायी आहे. चला जाणून घेऊयात, तिळाचे लाडू घरचे-घरी कसे तयार करायचे.

तिळाच्या लाडूचे साहित्य

तीळ – 200 ग्रॅम

तूप – 3 चमचे

कच्चे शेंगदाणे – 50 ग्रॅम

गूळ – 300 ग्रॅम

तिळाचे लाडू कसे बनवायचे

स्टेप -1

कढईत तीळ टाकून भाजून घ्या. एका ट्रेमध्ये काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. आता त्याच पॅनमध्ये शेंगदाणे टाका आणि सोनेरी होईपर्यंत भाजा. भाजलेले शेंगदाणे दुसऱ्या ट्रेमध्ये काढून थंड होऊ द्या. ते थंड झाल्यावर शेंगदाणे बारीक करून घ्या.

स्टेप – 2

आता त्याच कढईत तूप मंद आचेवर वितळवून घ्या. कढईत गूळ टाका आणि वितळू द्या. आता गॅसवरून पॅन काढा आणि 3 मिनिटे बाजूला ठेवा. त्यात तीळ आणि भाजलेले शेंगदाणे टाका आणि चांगले मिक्स करा.

स्टेप -3

पेस्ट एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून 5 मिनिटे थंड होऊ द्या. आता त्या मिश्रणाचे एक एक करून लाडू तयार करा. आता हे लाडू खाण्यासाठी तयार आहेत.

तिळाचे आरोग्य फायदे

तिळात भरपूर पोषक आणि अँटिऑक्सिडंट असतात. तिळाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सचे उत्कृष्ट स्रोत आहे. तिळाच्या बियांमध्ये तेल भरपूर असते, जे तुमच्या त्वचेसाठी, हाडांसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहे. तीळ विशेषतः कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात. हे नवीन हाडे तयार करण्यास आणि हाडे निरोगी ठेवण्यास मदत करतात.

संबंधित बातम्या : 

Ayurveda fruits Rules : फळांचे सेवन करताय? मग, आधी आयुर्वेदाने सांगितलेले ‘हे’ नियम जाणून घ्या!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI