AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : सध्याच्या हंगामात हेल्दी आणि निरोगी राहण्यासाठी ‘या’ फळांचा आहारात समावेश करा!

सध्याच्या हंगामात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. स्वत: ला तंदुरुस्त आणि मजबूत ठेवण्यासाठी आपण बर्‍याच गोष्टी करतो. अशा परिस्थितीत, आज आम्ही आपल्याला अशा फळाबद्दल सांगणार आहोत.

Health Care : सध्याच्या हंगामात हेल्दी आणि निरोगी राहण्यासाठी 'या' फळांचा आहारात समावेश करा!
फळ
| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 11:00 AM
Share

मुंबई : सध्याच्या हंगामात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. स्वत: ला तंदुरुस्त आणि मजबूत ठेवण्यासाठी आपण बर्‍याच गोष्टी करतो. अशा परिस्थितीत, आज आम्ही आपल्याला अशा फळाबद्दल सांगणार आहोत, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या फळांमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटामिन असते. (Include these fruits in your diet to stay healthy)

अननसमध्ये ब्रोमिलेन एन्झाइम असते. हे पाचन समस्यांवर मात करण्यास मदत करते. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. हे बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते. अननस खाल्ल्याने आतडेही निरोगी राहतात. अननसमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. याशिवाय त्यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म दाह कमी करण्यास मदत करतात.

स्ट्रॉबेरी खाण्यासाठी जेवढी चवदार आहे तेवढीच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरी शरीरातील अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता पूर्ण करू शकते. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटामिन आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. विशेष म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी स्ट्रॉबेरी गुणकारी आहे. स्ट्रॉबेरी व्हिटॅमिन आणि फायबरचं प्रमाण मोठ्या असते. यामध्ये पॉलिफेनोल्स नावाच्या अँटी-ऑक्सिडेंट देखील असतात.

सफरचंद खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सफरचंदमध्ये कँलरी कमी असून विटामिन सी, मिनिरल्सबरोबर फायबरची मात्रा जास्त प्रमाणात असते. त्यामुळेही वजन कमी होण्यास मदत होते. जर, आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर सफरचंद सालासमवेत खाण्याचा प्रयत्न करा. सफरचंद  खाल्ल्याने आपण अनेक रोगांपासून दूर राहू शकतो.

कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात. यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर मन शांत राहते आणि शरीराला उर्जाही मिळते. म्हणून कलिंगड खाण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. कलिंगड नियमीत खाल्लावर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. ज्यामुळे आपल्याला हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी पर्याप्त प्रमाणात आढळते, जे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि रोगांशी लढायला मदत करते. म्हणून मोसंबी खाणे चांगले मानले जाते. आता सध्याच्या काळात तर अनेक वेळा डाॅक्टर रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी मोसंबीचे खाण्याचा सल्ला देखील देतात. मोसंबीचे सेवन केल्यास ब्लड प्रेशरची समस्याही दूर होते. कारण ते शरीर डिटॉक्सीफाई करते आणि मोसंबी खाल्लाने केल्याने आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडते.

किवी फळ या दिवसांत प्रचंड लोकप्रिय झाले आहे आणि त्याला भारतातही जास्त मागणी आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, किवीमध्ये 173 मिलीग्राम व्हिटामिन सी असते, जो संत्र्यापेक्षा दुप्पट आहे. व्हिटामिन सी व्यतिरिक्त व्हिटामिन के, पोटॅशियम, मॅंगनीज, तांबे आणि आहारातील फायबर देखील किवीमध्ये आढळतात. या व्यतिरिक्त किवी अँटि-ऑक्सिडंट्सचा एक चांगला स्रोत आहे.

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include these fruits in your diet to stay healthy)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.