बजेट आहे कमी पण लूक हवाय क्लासी? वॉर्डरोबमध्ये करा ‘हे’ 6 बदल
तुम्ही तुमच्या बजेटमध्ये राहूनही श्रीमंत दिसू शकता, फक्त यासाठी तुम्हाला तुमच्या स्टाइलमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याची गरज आहे. चला, वॉर्डरोबमध्ये कोणते बदल केल्याने तुमच्या दिसण्याला 'रॉयल टच' मिळेल, ते जाणून घेऊया.

प्रत्येक व्यक्तीला ‘एलिगंट’ , ‘क्लासी’ आणि ‘रिच’ दिसायचे असते, म्हणजेच श्रीमंत आणि आकर्षक. पण अनेकदा लोकांना असे वाटते की, अशा प्रकारच्या ‘लूक’साठी खिशात चांगले पैसे असावे लागतात. मात्र, हे पूर्णपणे सत्य नाही! तुम्ही तुमच्या मर्यादित बजेटमध्ये राहूनही श्रीमंत दिसू शकता. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या ‘स्टाइलिंग’मध्ये काही स्मार्ट बदल करण्याची गरज आहे. चला, तुमच्या वॉर्डरोबमध्ये कोणते बदल केल्याने तुमच्या दिसण्याला ‘रॉयल टच’ मिळेल, ते जाणून घेऊया.
योग्य फिटिंग : ‘रॉयल लुक’साठी नेहमी तुमच्या ‘आउटफिट’च्या फिटिंगवर लक्ष द्या. श्रीमंत लोक नेहमी टेलर-फिटिंगचे कपडे घालतात. ढिलेढाले किंवा ‘ओव्हरसाईज्ड’ कपडे तुम्हाला सुस्त आणि बेफिकीर दाखवू शकतात. अनेक श्रीमंत लोक ब्रँडेड कपडे घालण्याऐवजी स्वतःचे कपडे डिझाइन करून घेतात, ज्यामुळे ते अधिक आकर्षक दिसतात.
न्यूट्रल आणि सॉलिड कलर्स : आपल्या वॉर्डरोबमध्ये न्यूट्रल आणि ‘सॉलिड कलर्स’ना अधिक महत्त्व द्या. ‘रिच’ आणि ‘एलिगंट लुक’साठी पांढरा , बेज, नेव्ही ब्लू , काळा आणि ऑलिव्ह ग्रीन यांसारखे रंग निवडा. जेव्हा तुम्ही डोक्यापासून पायांपर्यंत एकाच रंगाचे कपडे घालता, तेव्हा त्याला ‘मोनोक्रोम लूक’ म्हणतात, जो खूप ‘एक्सपेंसिव्ह’ दिसतो.
गोल्डन बटन आणि स्टेटमेंट ज्वेलरी : जर तुमच्या कपड्यांना (उदा. ब्लेझर, गाऊन किंवा वन पीस ड्रेस) गोल्डन बटणे लावली असतील, तर ती खूप ‘रॉयल लुक’ देतात. त्याचप्रमाणे, ‘स्टेटमेंट ज्वेलरी’ (म्हणजे लक्ष वेधून घेणारे मोठे दागिने) घाला. हे दागिनेही गोल्डन रंगाचेच असावेत. हे तुमच्या दिसण्याला अधिक आकर्षक बनवतात.
पर्ल ज्वेलरी : मोत्यांची ज्वेलरी श्रीमंत लोकांची खासियत मानली जाते. तुम्ही त्यांना कोणत्याही प्रसंगाला परिधान करू शकता. जर तुम्हाला ‘एलीट लूक’ हवा असेल, तर नेहमी सिंगल पर्लचे (एकच मोती असलेले) पेंडेंट, रिंग किंवा इअररिंग घाला. हे दागिने तुम्ही पारंपरिक भारतीय किंवा वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारच्या पोशाखांसोबत मॅच करू शकता.
योग्य ‘फॅब्रिक’ आणि ‘स्किन शो’ : तुमच्या वॉर्डरोबमध्ये लिनेन (Linen), कॉटन (Cotton) किंवा सिल्क (Silk) यांसारख्या चांगल्या ‘फॅब्रिक’चे कपडे समाविष्ट करा. हे ‘फॅब्रिक्स’ दिसायला ‘क्लासी’ आणि आरामदायक असतात. तुम्ही जे काही कपडे घालाल, त्यात जास्त ‘स्किन शो’ (म्हणजे जास्त त्वचा दिसणार नाही) होणार नाही याची खास काळजी घ्या. साधेपणा आणि नजाकत हे ‘क्लासी लुक’चे महत्त्वाचे घटक आहेत.
केस, नखे आणि फुटवेअर
कपडे कितीही चांगले असले, तरी जर ‘फुटवेअर’ (चप्पल/बूट) योग्य नसतील, तर संपूर्ण लुक खराब होतो. कधीही ‘हाय हील्स’ (High Heels) घालणे टाळा, कारण ते अनेकदा ‘क्लासी’ दिसत नाहीत. त्याऐवजी ‘फ्लॅट फुटवेअर’ नेहमी ‘क्लासी’ दिसतात. स्वच्छ आणि साधे लेदर शूज किंवा ‘लोफर्स’ देखील तुम्ही वापरू शकता. याशिवाय, तुमचे केस नेहमी बांधलेले असावेत आणि नखे लहान आणि स्वच्छ असावीत. या छोट्या गोष्टी तुमच्या दिसण्याला ‘फिनिशिंग टच’ देतात.
