चहाची गाळणी काळीकुट्ट पडलीय? ‘या’ ५ जादुई उपायांनी करा साफ
स्वयंपाकघरातील जुन्या चाळण्या फेकून देण्याऐवजी त्यांना नवसंजीवनी देण्याचा हा पर्यावरणपूरक आणि खर्च वाचवणारा मार्ग आहे. महाग क्लीनिंग प्रॉडक्ट्सपेक्षा हे घरगुती उपाय अधिक प्रभावी आणि सुरक्षित आहेत.

घराघरात रोज चहा बनतो आणि त्यासाठी गाळणीचा वापर अपरिहार्य असतो. मात्र सतत वापरल्यामुळे गाळणीवर चहाचे डाग, गडद थर आणि काळसरपणा बसतो. साबण आणि पाण्याने धुतल्यावरही गाळणीची मुळातली चमक परत येत नाही. मग अशावेळी काय करायचं? तुमच्याच घरातल्या स्वयंपाकघरातील काही वस्तूंनी तुम्ही चहाची गाळणी पुन्हा एकदम नवीनसारखी चमकवू शकता तेही कोणतेही महाग क्लीनर न वापरता. चला पाहूया अशाच काही सोप्या, स्वस्त आणि परिणामकारक घरगुती पद्धती!
1. लिंबूमध्ये असलेले सिट्रिक अॅसिड आणि मीठ हे नैसर्गिक स्क्रबरचे काम करतात. अर्धा लिंबू घ्या, त्यावर मीठ भुरा आणि त्याने गाळणी चोळा. ५ ते १० मिनिटे तसेच ठेवून नंतर कोमट पाण्याने धुवा. डाग झटक्यात निघून जातील.
2. रोजच्या वापरातील टूथपेस्टदेखील इथे उपयुक्त ठरते. थोडीशी टूथपेस्ट गाळणीवर लावून जुन्या टूथब्रशने चोळा. यामुळे गाळणीवरील चिकट थर निघून जातो आणि तिचा नैसर्गिक चमक परततो.
3. एका वाटीत दोन चमचे बेकिंग सोडा आणि एक कप व्हिनेगर मिसळा. ही मिश्रण गाळणीत ओता आणि १५ मिनिटांसाठी ठेवून द्या. रासायनिक प्रतिक्रिया झाल्यावर गाळणीवरची सगळी काळी पुटं सहज निघते. नंतर ब्रशने घासून पाण्याने धुवा.
4. जर वेळ कमी असेल आणि गाळणी फारशी घाण नसेल, तर ती गरम पाण्यात थोडं डिटर्जंट घालून १० मिनिटे भिजवा. यामुळे हलकाच डाग असलेली गाळणीही झटपट स्वच्छ होते.
5. बेसन आणि हळद एकत्र करून त्यात थोडं पाणी मिसळा आणि पेस्ट तयार करा. गाळणीवर लावून १० मिनिटांनी चोळा आणि धुवा. गाळणी एकदम ताजी वाटेल
गाळणीची स्वच्छता का महत्वाची आहे ?
1. गाळणीवर चहाचे जुने अवशेष साठलेले असतील, तर त्याचा परिणाम चहाच्या चव आणि रंगावर होतो. अशा गाळणीतून गाळलेला चहा कडवट किंवा खवखवीत लागतो. स्वच्छ गाळणीमुळे चहा ताजा, शुद्ध आणि चविष्ट राहतो.
2. गाळणीवर सतत डाग, धूळ किंवा बुरशी जमा होत असेल तर त्यातून जीवाणूंचा प्रसार होऊ शकतो. अशा गाळणीतून चहा गाळल्यास पचनतंत्रावर किंवा त्वचेसंबंधी त्रास होऊ शकतात. त्यामुळे नियमित स्वच्छता ही आरोग्यासाठी महत्त्वाची आहे.
3. जर गाळणी वेळोवेळी स्वच्छ केली गेली नाही, तर तिच्या जाळीला गंज लागू शकतो किंवा ती खवखवीत होऊन तुटण्याची शक्यता वाढते. स्वच्छ गाळणी तिचा वापर कालावधी वाढवते आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा नवी घेण्याची गरज लागत नाही.
