AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुणांमध्ये वाढतेय सर्व्हीकल स्पॉन्डिलायटिसची समस्या, जाणून घ्या कारणे आणि उपाययोजना

तरुणांमध्ये वाढतेय सर्व्हीकल स्पॉन्डिलायटिसची समस्या, जाणून घ्या कारणे आणि उपाययोजना (The problem of increasing cervical spondylitis in young people, know the causes and remedies)

तरुणांमध्ये वाढतेय सर्व्हीकल स्पॉन्डिलायटिसची समस्या, जाणून घ्या कारणे आणि उपाययोजना
तरुणांमध्ये वाढतेय सर्व्हीकल स्पॉन्डिलायटिसची समस्या
| Edited By: | Updated on: Mar 05, 2021 | 7:24 AM
Share

मुंबई : एक काळ असा होता की, लोकांना सर्व्हिकल स्पॉन्डिलायटीस सारख्या समस्येचे नाव देखील माहित नव्हते. पण आजकाल ही समस्या खूप सामान्य झाली आहे. गेल्या काही वर्षांत, तरुणांमध्ये ही समस्या 60 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. इतकेच नाही तर, कधीकधी सर्व्हिकल स्पॉन्डिलायटीसची समस्या किशोरवयीन आणि लहान मुलांमध्ये देखील दिसून येते. (The problem of increasing cervical spondylitis in young people, know the causes and remedies)

तज्ञांच्या मते, सर्व्हिकल स्पॉन्डिलायटीस हा एक जीवनशैलीचा रोग आहे. ही समस्या स्पाईनचा सर्वात वरच्या भाग सर्व्हिकल स्पाईनमध्ये उद्भवते. म्हणूनच याला सर्व्हिकल स्पॉन्डिलायटीस म्हणतात. मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये घालवलेले तास, चुकीच्या मार्गाने बसणे, चुकीच्या पद्धतीने झोपणे, व्यायाम न करण्याची सवय आणि तणाव इ. ही याची प्रमुख कारणे आहेत.

या लक्षणांवरुन ओळखा

याची सुरुवात मानेच्या खाली वेदनेने होते. हळूहळू ही वेदना खांद्यांपर्यंत, पाठितून हातापर्यंत पोहोचते. बर्‍याच वेळा डोकेदुखी आणि चक्कर येणे आदि समस्या देखील सुरु होतात. आपल्याला या प्रकारची समस्या असल्यास, त्यास गंभीरपणे घ्या आणि तज्ञांचा सल्ला घ्या अन्यथा समस्या गंभीर स्वरुपाचे रूप धारण करू शकते.

हे आहेत उपचार

सर्व्हिकल स्पॉन्डिलायटिसवर कोणतेही अचूक उपचार नाही, कारण हा जीवनशैलीचा आजार आहे. परंतु जीवनशैलीत बदल करुन आणि काही योगसासनाच्या मदतीने हे नियंत्रित केले जाऊ शकते. याशिवाय काहीवेळा तज्ञ गळ्यात कॉलर लावण्याचीही शिफारस करतात. तज्ञाने ठरविलेली औषधे वेळेत घ्या आणि त्यांच्या सूचनांचे अनुसरण करा.

या योगासनांमुळे होऊ शकतो लाभ

सर्व्हिकल स्पॉन्डिलायटीसचे रुग्ण तज्ञांच्या सल्ल्यानुसार काही सूक्ष्म व्यायाम, मत्स्यासन, भुजंगासन, सर्वांगासन, अर्ध नौकासन, मार्जारासन, मकरसन इत्यादी करू शकतात. परंतु हे लक्षात ठेवा की कोणताही वाकण्याचा व्यायाम करू नये. यामुळे समस्या आणखी वाढू शकते.

या समस्येपासून बचावासाठी काय कराल

1. सतत मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम करू नका. मान वारंवार हलवत रहा.

2. सतत खाली वाकून कोणतेही काम करु नका.

3. अधिक मऊ अंथरुणावर झोपू नका.

4. नियमित व्यायाम करा.

5. आवश्यकतेपेक्षा अधिक वजन उचलू नका.

6. पाणी भरपूर प्या आणि कॅल्शियमयुक्त आहार घ्या. (The problem of increasing cervical spondylitis in young people, know the causes and remedies)

इतर बातम्या

Teeth Whitening  | दातांचा पिवळेपणा 2 मिनिटात दूर करण्यासाठी भन्नाट टिप्स!

World Obesity Day | तुमच्या ‘या’ सवयी ठरतात लठ्ठपणाच्या समस्येला कारणीभूत, त्वरित बदलण्याची गरज!

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.