AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात ऑर्गेन्झा सारख्या ‘या’ कापडांपासून बनवलेले कपडे परिधान करण्याची करू नका चूक

आजकाल ऑर्गेन्झा फॅब्रिक खूप ट्रेंडमध्ये आहे. त्यात तुम्हाला साडीपासून ते ड्रेसपर्यंत सर्व प्रकार पाहायला मिळतात. पण उन्हाळ्यात या फॅब्रिकचे कपडे परिधान करणे सोपे नाही. कारण उन्हाळ्यात, लोकं आरामदायी आणि श्वास घेण्यायोग्य कापड निवडण्यास प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत, उन्हाळ्यात ऑर्गेन्झा सोबत कोणते कापड निवडू नये हे जाणून घेऊया.

उन्हाळ्यात ऑर्गेन्झा सारख्या 'या' कापडांपासून बनवलेले कपडे परिधान करण्याची करू नका चूक
ही चूक करू नका Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: May 13, 2025 | 3:24 PM
Share

उन्हाळा येताच आपण सर्वजण आपल्या कपाटात हलके, आरामदायी आणि श्वास घेण्यायोग्य कपडे ठेवण्यास सुरूवात करतो. या हंगामात कॉटन, लिनेन, रेयॉन सारखे कापड सर्वात आरामदायक मानले जातात, कारण ते घाम शोषून घेतात आणि हवा शरीरात पोहोचू देतात. पण फॅशनच्या जगात असे काही कपडे आहेत जे खूप स्टायलिश आणि ट्रेंडी दिसतात, पण प्रत्यक्षात ते उन्हाळ्याच्या हंगामासाठी अजिबात योग्य नसतात.

ऑर्गेन्झा देखील त्यापैकी एक आहे. हे एक हलके, पारदर्शक आणि चमकदार कापड आहे जे पार्टी वेअर, कुर्ती, साड्या आणि गाऊनमध्ये खूप लोकप्रिय आहे. पण तुम्हाला माहित आहे का की उन्हाळ्यात ऑर्गेन्झा आणि इतर फॅब्रिक कापड तुमच्या शरीरासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे असू शकतात? हे कपडे केवळ हवाच रोखत नाहीत तर उन्हाळ्यात येणारा शरीरातील घाम देखील शोषून घेत नाहीत, ज्यामुळे त्वचेवर जळजळ, खाज सुटणे आणि अगदी उष्णतेचे पुरळ देखील येऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात ऑर्गेन्झासारखे दिसणारे कोणते कापड तुम्ही परिधान करू नयेत ते जाणून घेऊया.

1. ऑर्गेन्झा

आजकाल ऑर्गेन्झा फॅब्रिक खूप ट्रेंडमध्ये आहे. त्यात ह्या फ्रब्रिकला सर्वाधिक पसंत केले जाते. पण हे कापड उन्हाळ्याच्या दिवसात परिधान करण्यासाठी चांगले नाही. जरी ते खूप पातळ आणि पारदर्शक असले तरी हे कापड सिंथेटिक फायबरपासून बनलेले आहे. त्यामुळे फॅब्रिकचे कापड तुमच्या शरीराचा घाम शोषत नाही आणि बाहेरही पडू देत नाही. अशाने उन्हाळ्यात हे कापड आपल्या त्वचेला चिकटून राहते आणि त्यामुळे उष्माघाताची समस्या निर्माण होऊ शकते.

2. नेट फॅब्रिक

नेट फॅब्रिकचे कपडे फॅशन ट्रेंडमध्ये असेल, पण उन्हाळ्यात हे फॅब्रिक त्वचेला आराम देत नाही. जरी हे नेट फॅब्रिकचे कपडे परिधान केल्यानंतर व्हेंटिलेशन प्रदान करत असले तरी, कापडाचा पोत त्वचेला टोचू शकतो, ज्यामुळे पुरळ आणि खाज येऊ शकते.

3. पॉलिस्टर ऑर्गेन्झा

ऑर्गेन्झा बहुतेकदा पॉलिस्टर किंवा नायलॉनपासून बनवले जाते, ज्यामुळे ते आणखी आपल्या त्वचेला कमी श्वास घेण्यायोग्य बनवते. उन्हाळ्यात दिवसात तुम्ही अशा फॅब्रिकचे कपडे परिधान केल्याने घाम अधिक येत राहतो तसेच घाम शोषला जात नाही. त्यामूळे शरीरावर खाज सुटणे, पुरळ येणे किंवा अगदी ॲलर्जी देखील होऊ शकते. म्हणून, उन्हाळ्यात या कापडापासून बनवलेले कपडे घालू नयेत.

4. जॉर्जेट

जॉर्जेट फॅब्रिकचे कपडे देखील उन्हाळ्यात परिधान करू नये. कारण हे फॅब्रिक खूप जड असते आणि जॉर्जेटचे कपडे परिधान केल्याने उन्हाळ्यात खूप घाम येतो, ज्यामुळे शरीरात खाज सुटणे आणि जळजळ होऊ शकते. तसेच हे कापड शरीराला उष्णता देते आणि परिधान केल्यानंतर खूप अस्वस्थ वाटते.

पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.