या सवयींमुळे होऊ शकतं ब्रेकअप… तुमच्यात आहेत का या सवयी? मग आजच दूर करा

तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये आहात आणि तुमच्या काही सवयींमुळे तुमचं नातं ब्रेकअपच्या मार्गावर आहे, तर थांबा या सवयींना वेळीच आळा घाला आणि तुमचं नातं घट्ट करा.

या सवयींमुळे होऊ शकतं ब्रेकअप... तुमच्यात आहेत का या सवयी? मग आजच दूर करा
Love
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 6:56 PM

मुंबई : तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये आहात आणि तुमच्या काही सवयींमुळे तुमचं नातं ब्रेकअपच्या मार्गावर आहे, तर थांबा या सवयींना वेळीच आळा घाला आणि तुमचं नातं घट्ट करा. प्रत्येक नात्याला वेळेची गरज असते. कुठलीही गोष्ट लगेचच बदलत नाही. सवयी बदलण्यास आणि सवय लागण्यास वेळ लागतो. पण जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात तर छोट्या छोट्या गोष्टी असतात. ज्या केल्या तर नातं अधिक घट्ट होऊ शकतं. (these habits can become reason for your breakup)

नात्यात आपण एकमेकांची काळजी घेतो. त्यासाठी एकमेकांना फोन करुन त्याच्या तब्येतीची, त्याच्या खाण्यापिण्याची विचारपूस करतो. पण या धावपळीच्या जगात, ऑफिसमधील किंवा घरामधील कामात तुम्ही व्यस्त असाल आणि तुम्हाला फोन करायला जमलं नाही. तर तो आपली काळजी करत नाही असं समजू नका. अशावेळी तुम्ही बिझी असाल तर मेसेज करुन याची कल्पना आपल्या जोडीदाराला द्या. पण तो आपली काळजी करत नाही. किंवा तो आपल्याला इग्नोर करत आहे, असं न समजता त्याची परिस्थिती समजून घ्या. तुमच्या कामाबद्दल तुमच्या जोडीदाराला व्यवस्थित कल्पना द्या जेणेकरुन फोन किंवा मेसेज आपण करु शकलो नाही तर गैरसमज होता कामा नये.

नातं म्हणजे एकमेकांची साथ. सतत एकमेकांसोबत राहावं असं वाटणं. जर तुमचं नातं नवीन असेल तर या नात्याला वेळेची खूप गरज असते. एकमेकांना समजून घ्यायला, एकमेकांच्या आवडीनिवडी, जीवनशैली जाणून घेण्यासाठी वेळेची गरज असते. यासगळ्याने तुमचं नातं घट्ट होतं. त्यामुळे नात्याला, त्या व्यक्तीला कायम वेळ द्या. आपण जगण्यासाठी स्पर्धेच्या जगात सगळे जण धावत आहोत. पण या स्पर्धेत नातं कुठे मागे राहू नये याची काळजी घेतली गेली पाहिजे. फार काही नाही धावपळीच्या जगातून आपल्या या प्रिय व्यक्तीसाठी थोडा वेळ नक्की काढा. तसं तर नातं नवीन असो वा जुनं वेळ हा दिलाच पाहिजे. वेळ देऊ शकत नाही म्हणून अनेक नाती तुटताना आपण पाहत आहोत. मग अशी वेळ तुमच्या नात्यामध्ये येऊ देऊ नका.

नात्यामध्ये सगळ्यात जास्त गरजेची असते ती म्हणजे पर्सनल स्पेस. ती स्त्री असो वा पुरुष त्यांना त्यांची पर्सनल स्पेस मिळालीच पाहिजे. आपल्याला जोडीदाराच्या आयुष्यातील गोष्टी माहिती असल्या पाहिजे पण याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही त्याचा फोन, मेसेज चेक कराल. आणि तुमची हीच चुक तुमच्या नात्याला तोडण्यास कारणीभूत ठरते. शेवटी नातं म्हटलं की विश्वास आलाच आणि तो असायलाच हवा.

मोबाईल…

सध्या जगात मोबाईल हा लोकांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग झाला आहे. पण मोबाईल सुद्धा तुमच्या ब्रेकअपचं कारण होऊ शकतं. तुमचा जोडीदार सोबत असला तरी तुम्ही मोबाईलवर वेळ घालवत असाल, तर असं करु नका. तुमच्या जोडीदाराला वेळ द्या. त्याच्याशी तुमच्या मनातील गोष्टी सांगा, त्याचे विचार लक्षपूर्वक ऐका. या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्या लक्षात येत नाहीत, पण या आपल्या नात्याला ब्रेकअपकडे कधी घेऊन जातात कळत नाही. म्हणून जर तुम्ही असं काही करत असाल तर नवीन वर्षाची सुरुवात नव्या सवयींनी करा. तुमच्या जुन्या वाईट सवयी बदला आणि नातं नव्याने जगा.

इतर बातम्या

News Year | बजेट नाही…मग कसं करणार न्यू इयर साजरा..हे आहेत तुमच्या बजेटमधील काही स्पेशल लोकेशन

ख्रिसमस जवळ आलाय, मग लहान मुलांना खूष करण्याच्या भन्नाट आयडिया हव्यात, वाचा एका क्लिकवर

हिवाळ्यात चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी तुमच्या आहारात या 5 सुपरफूड्सचा समावेश करा!

(these habits can become reason for your breakup)

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.