Fashion Tips : हिवाळ्यात स्टायलिश दिसायचं आहे ?, मग ‘या’ चुका करणं टाळा

हिवाळ्यात फॅशनेबल आणि स्टाइलिश दिसणं अवघड असतं. अशा परिस्थितीत ड्रेससोबत स्वेटर कॅरी करावं की जॅकेट असा गोंधळ उडतो.(Want to look stylish in winter? Then avoid making these mistakes)

Fashion Tips : हिवाळ्यात स्टायलिश दिसायचं आहे ?, मग 'या' चुका करणं टाळा
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 5:53 PM

मुंबई : हिवाळ्यात फॅशनेबल आणि स्टाइलिश दिसणं अवघड असतं. अशा परिस्थितीत ड्रेससोबत स्वेटर कॅरी करावं की जॅकेट असा गोंधळ उडतो. कोणत्या कपड्यांसोबत कोणते शूज घालायचे? असा प्रश्नसुद्धा नेहमीच पडतो. कधीकधी, महागडे कपडे घालूनही तुम्ही काही कॉमन चुका करता ज्यामुळे तुम्हाला हवा असलेला लूक मिळत नाही.

हिवाळ्यात फॅशनेबल आणि स्टाईलिश दिसण्यासाठी तुम्ही या चुका टाळल्या पाहिजे.

रंगीबेरंगी लेअरिंग हिवाळ्यात, तुम्ही स्वतःला स्टाईलिश आणि फिट दर्शविण्यासाठी अनेकदा कपड्यांची लेअर करत परिधान करतो. मात्र लेअरिंग करताना वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालण्याऐवजी सारख्या रंगाचे कपडे घाला. हिवाळ्यात, कलरफुल कपडे परिधान करण्याएवजी न्यूट्रल रंगाचे कपडे वापरा. तुम्ही तुमच्या ड्रेससह स्कार्फ, ग्लोव्हज, कॅप्ससारखे अॅक्सेसरीजसुद्धा कॅरी करू शकता.

अँकल पूर्ण झाकून घ्या

हिवाळ्यात, बरेच लोक अँकलला खुलं ठेवतात. बऱ्याच लोकांना पारंपारिक पोशाखात पाय झाकणं आवडत नाही. तर काही लोक अँकल लेन्थ लांबीचे जीन्स आणि क्रॉप टॉप परिधान करतात. आपलं अँकल जास्त दिसत नाही ना हे नेहमी लक्षात घ्या. जास्त अँकल दिसत असेल तर तुम्ही त्यासह स्किन कलरचे मोजे वापरू शकता.

एथनिक ड्रेससह कॅज्युअल जॅकेट्स बहुतेक लोक एथनिक ड्रेससह कॅज्युअल जॅकेट घालतात जे अजिबात चांगलं दिसत नाही. तुम्ही अशा ड्रेसवर एथनिक जॅकेट किंवा कोट घातला पाहिजे. त्यासाठी तुमच्या कपाटात नेहमी एक-दोन एथनिक विंटर जॅकेट ठेवा.

सैल स्वेटर आणि जॅकेट परिधान करणं टाळा

लोकांना असं वाटतं की हिवाळ्यात सैल स्वेटर आणि जॅकेट चांगले दिसतात. मात्र विश्वास ठेवा, यात तुमच्या शरीराचा आकार चांगला दिसत नाही. सैल जॅकेटमध्ये तुमचं शरीर जड दिसू शकतं. नेहमी फिट जॅकेट्स आणि स्वेटर परिधान करा.

संबंधित बातम्या

Skin Care | थंडीमुळे कोरड्या पडलेल्या चेहऱ्याला मॉश्चराइझ करायचंय? वापरा घरगुती ‘स्ट्रॉबेरी फेस पॅक’!

Fitness | अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी जिमची गरज नाही! घरच्या घरी करा ‘हे’ सोपे व्यायाम प्रकार…

Work From Home | ‘वर्क फ्रॉम होम’ करून हाताची बोटं दुखतायत? मग, ‘हे’ उपाय नक्की ट्राय करा!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.